Home » Blog » Jarange’s determination  : गोळ्या घातल्या तरी आता मागे हटणार नाही : मनोज जरांगे

Jarange’s determination  : गोळ्या घातल्या तरी आता मागे हटणार नाही : मनोज जरांगे

by प्रतिनिधी
0 comments
Jarange's determination

मुंबई : प्रतिनिधी : “जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.  सगळ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी मुंबई सोडणार नाही. गोळ्या घातल्या तरी आता मागे हटणार नाही,”  असा ठाम निर्धार मराठा आरक्षण मागणीचे नेते मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात केला. जरांगे यांनी आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बेमुदत उपोषणास सुरुवात केली. (Jarange’s determination)

लाखो मराठा समर्थकांसह मनोज जरांगे यांचे मुंबईत आगमान झाले. शेकडो वाहनांचा ताफा मुंबईत दाखल झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली.  मुंबईत आझाद मैदानात उपोषणास जरांगेंनी सुरुवात केली.  तत्पुर्वी आझाद मैदानावर दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांसह सरकारलाही मोठं आवाहन केले आहे.

जरांगे पाटील म्हणाले की, “आपले ठरले होते की उपोषण आझाद मैदानावरच करायचे, आणि त्याप्रमाणे आपण उपोषण सुरू केले आहे.” ते पुढे म्हणाले की, “सरकार आपल्याला सहकार्य करत नव्हते, म्हणून मराठ्यांनी मुंबईत जाऊन मुंबई जाम करण्याचा निर्णय घेतला, आणि आपण ते केले आहे.” आता सरकारने आंदोलनाला परवानगी देऊन सहकार्य केले असल्याने, त्यांनी सरकारचे कौतुक केले. आता सरकारने सहकार्य केले आहे, म्हणून आपणही सरकारला सहकार्य केले पाहिजे,” असे सांगत त्यांनी आपल्या समर्थकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. (Jarange’s determination)

जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मुंबईत आपली एकही गाडी रस्त्यावर राहता कामा नये. पोलीस सांगतील तिथेच गाड्या लावा.” त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.  त्यांनी आंदोलकांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याचे आवाहन केले. “मुंबई तुम्ही जाम केली, दोन तासात मुंबई मोकळी झाली पाहिजे. एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे, पोलीस बांधव नाराज झाले नाही पाहिजेत, कुठेही ट्रॅफिक जाम झाली नाही पाहिजे,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. (Jarange’s determination)

“जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, तशी बेमुदत मागणी आपण करू. सगळ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी मुंबई सोडणार नाही. गोळ्या घातल्या तरी आता मागे हटत नाही,” असा निर्धार जरांगे यांनी केले. “आपण समाजाला न्याय देण्यासाठी इथे आलो आहोत, गडबड-गोंधळ घालून वाटोळे करू नका,” असे सांगत त्यांनी एकजुटीने आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन पुढे नेण्याचे आवाहन केले. जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केल्याने या आंदोलनाने एक नवीन दिशा घेतली आहे. आता सरकार आणि प्रशासन आंदोलकांच्या मागण्या कशा पूर्ण करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Jarange’s determination)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00