विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नऊ गडयांनी दणदणीत पराभव करत भारताने मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. दक्षिण आफ्रिकेचे २७१ धावांचे आव्हान भारताने एक गडी गमावून पार केले. सलामीवीर यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकावत नाबाद ११६ धावांची खेळी केली. जयस्वालचे एकदिवसीय सामन्यातील हे पहिले शतक आहे. (India won the series)
भारताने १० षटके शिल्लक असताना भारताने आफ्रिकेची धावसंख्या पार केली. मालिकेत सलग दोन शतके झळकावणाऱ्या विराट कोहलीने ४५ चेंडूत नाबाद ६५ धावा केल्या. त्याने विजयी चौकार मारला. रोहित शर्माने ७५ धावा केल्या. त्याने या सामन्यात आंतरराष्ट्रीय सामन्यातील वीस हजार धावांचा टप्पा ओलांडला. तो सचिन तेंडूलकर, विराट कोहली, राहूल द्रविड यांच्या पंगतीत सामील झाला. (India won the series)
त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेला भारताने ४७.५ षटकात २७० धावात गुंडाळले. सलामीवीर क्विंटन डी कॉकने ८९ चेंडूत शतक झळकावत १०६ धावा केल्या. भारताविरुद्ध त्याचे सातवे शतक आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादवने भेदक मारा करताना प्रत्येकी चार गडी बाद केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव आटोपला. (India won the series)