मुंबई : नगरपालिका, नगरपरिषद मतमोजणी २१ डिसेंबरला होणार असल्याने त्या दिवशी होणारी एमपीएससीची संयुक्त परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढे ढकलेली परीक्षा पुढील वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चार जानेवारीला होणार आहे. (MPSC Exam Postponed)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फेत ६७४ पदांच्या भरतीसाठी परीक्षा नऊ नोव्हेंबरला होणार होती. मात्र राज्यात काही भागात आलेल्या पूर परिस्थितीमुळे राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ही परीक्षा २१ डिसेंबरला परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली. तीन सहाय्यक कक्ष अधिकारी, २७९ राज्य कर निरीक्षक, ३९२ पोलिस उप निरीक्षक पदांचा समावेश आहे. या परिक्षेसाठी विद्यार्थी युद्धपातळीवर अभ्यास करत आहेत. (MPSC Exam Postponed)
नगरपालिका आणि नगरपरिषदेची निवडणूक २ डिसेंबरला झाला. तीन डिसेंबरला निवडणूकीचा निकाल लागला होता. पण मतदान आणि मतमोजणी न्यायप्रविष्ठ झाल्याने न्यायालयाने मतमोजणी पुढे ढकलून २१ डिसेंबरला जाहीर करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे २१ डिसेंबरला एमपीएससीच्या परीक्षेचे काय होणार? याकडे परीक्षार्थीचे लक्ष लागले होते. एमपीएसची परीक्षा महसूल अधिकारी आणि कर्मचारी नियंत्रित करतात. पण ही परीक्षा राबवणारे महसूलचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक निकालात गुंतुन पडणार असल्याने २१ डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा रविवारी ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. (MPSC Exam Postponed)