Home » Blog » Break up FRP : राज्य सरकारला एफआरपीचे तुकडे करु देणार नाही : राजू शेट्टी

Break up FRP : राज्य सरकारला एफआरपीचे तुकडे करु देणार नाही : राजू शेट्टी

by प्रतिनिधी
0 comments
Break up FRP

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्य सरकार व राज्य साखर संघाने संगनमताने नुरा कुस्ती खेळून राज्यातील उस उत्पादक शेतक-यांना पुन्हा एकदा तुकड्या तुकड्याने एफ. आर. पी. मिळावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली आहे. साखर संघ व राज्य सरकारचा हा रडीचा डाव यशस्वी होवू देणार नसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिली. (Break up FRP)

        राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या वतीने जवळपास तीन वर्षे न्यायालयीन लढाई करून एक रक्कमी एफ. आर. पी. देण्याचा निर्णय पुर्ववत करण्याबाबत मा. मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आला होता. या प्रकरणामध्ये राज्यातील राज्य साखर संघ , राज्य सरकार , केंद्र सरकार हे सर्वजण शेतक-यांच्याविरोधात भुमिका मांडली होती. एफ. आर. पी. कशापध्दतीने एक रक्कमी देणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे याबाबत  ५० तास सुनावणी सुरू होती. या सुनावणी दरम्यान राज्य सरकार , राज्य साखर संघ व केंद्र सरकारने आपली भुमिका मांडली होती तरीही मा. उच्च न्यायालयाने सर्व गोष्टीची कायदेशीर बाजू ऐकून घेऊनच हा निर्णय दिलेला होता. (Break up FRP)

राज्यात ऊस उत्पादक शेतक-यांना वेळेवर बिले मिळत नसल्याने आत्महत्या करू लागले आहेत.  याआधी राज्य साखर संघाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या निर्णयास स्थगिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आल्याने राज्य सरकार व राज्य साखर संघ रडीचा डाव खेळत आहे. दोघांच्या संगनमताने सदर प्रकरण न्यायालयात न्याय प्रविष्ट करून एक रक्कमी एफ. आर. पी न देण्याचा प्रयत्न जोरदारपणे सुरू आहे. सोमवारी या याचिकेमध्ये  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने  ॲड. योगेश पांडे हे हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. (Break up FRP)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00