Home » Blog » अंधभक्तांविरोधातील लढाईत देशभक्तांचा विजय

अंधभक्तांविरोधातील लढाईत देशभक्तांचा विजय

मुंबईत शिवाजी पार्कवरील तिरंगा रॅलीत उद्धव ठाकरेंचा घणाघात

by जमीर काझी
0 comments
  • जमीर काझी

मुंबई: आज कोणत्याही निवडणुकीमध्ये आपला विजय झाला नसला, आपण जिंकलो नसलो तरीही अंधभक्तांच्या विरोधातल्या लढाईमध्ये देशभक्तांचा विजय झाला आहे. ज्यांना कॉक्रोच म्हणून हिणवले त्यांच्यासमोरच मोदी सरकारला गुडघे टेकावे लागले, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपावर केला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरच्या मुंबईतील शिवाजी पार्कवरील तिरंगा रॅलीमध्ये ते बोलत होते.

रोहित पवारही सहभागी

जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी तिरंगा मोर्चा जाहीर केला होता. मात्र शनिवारी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने मोर्चाऐवजी त्याचे रूपांतर विजयी सभेत करण्यात आले. यामध्ये उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंसह, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार आदी उपस्थित होते. (Thackeray Brothers Tiranga Rally)

पावसाची संततधार सुरू असतानाही सभेसाठी मोठ्या प्रमाणात ‘जेनझी’, विद्यार्थी व पालक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तिरंगा झेंड्याबरोबरच केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, धर्मेंद्र प्रधान, व भाजपाचे निषेध करणारे फलक आणि टॅगलाइन सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. तरुणाईने हातात तिरंगा घेत या विजयाचा जल्लोष साजरा केला.

झुरळाने हुकूमशाही नमवली

उपस्थित तरुणाईला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की,’नवी दिल्लीतील जंतर-मंतरवरीवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ३६ व्या दिवशी यश आले. जात, पात, धर्म विसरून भारतीय आणि देशभक्त म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत, यासाठी सगळ्यांचे आभार. “एका झुरळानं हुकूमशाहीला नमवलं आहे, हाच खरा विष्णूचा अवतार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता तरी राजकारणातून वेळ काढून देशाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. तुमचे मंत्री जे स्वतःची कामं सोडून फक्त पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत, त्यांना आता तरी काहीतरी काम करायला सांगा”, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. (Thackeray Brothers Tiranga Rally)

ते म्हणाले ,”निर्मला सीतारमण घसरणारा रुपया किंवा वाढत्या महागाईवर काहीही बोलत नाही, मात्र पेपरफुटीचे फायदे सांगत आहेत. तर राजनाथ सिंह यांच्या काळात देशाच्या सुरक्षेची बोंब झाली. देश सोडून स्वतःच्या पक्षातील धर्मेंद्र प्रधानांचं ते रक्षण करत आहेत. “मोदीजी, तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला पदावरून काढताना प्रचंड यातना झाल्यात. मात्र त्याहून जास्त यातना या निष्पाप मुलांच्या कुटुंबियांना झाल्यात ज्यांचा बळी या व्यवस्थेने घेतला”, अशी टीका केली.

सुरवातीला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या २१ विद्यार्थ्यांची नावं वाचली. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (Thackeray Brothers Tiranga Rally)

You may also like

error: Content is protected !!