जमीर काझी : मुंबई : राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी हायकोर्टात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी गुरुवारी ही याचिका दाखल केली. यावर लवकरच हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. (Petition in High Court in Ajit Pawar accident case)
या याचिकेतून अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू होण्यापूर्वीच्या काही तासांत घडलेल्या आणि मृत्यूनंतर समोर आलेल्या गोष्टींवर या याचिकेतून सवाल उपस्थित करण्यात आलेत. ही याचिका दाखल करण्यापूर्वी केतन तिरोडकर यांनी आरटीआयद्वारे डीजीसीए, सीएमओ यांना अनेक ईमेल पाठवून काही गोष्टींची विचारणा केलीय. मात्र, त्यावर कोणतंही समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्यांनी ही याचिका दाखल केली. व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंह हा अद्याप भारतात आहे का तो पसार झालाय?, असा सवालही उपस्थित केला आहे . (Petition in High Court in Ajit Pawar accident case)
विमान उतरवण्यात अडचणी येत होत्या. तेव्हा वैमानिकानं एटीसी सोबत संपर्क साधला होता का?, त्यांना काय पर्याय सुचवण्यात आले?, अजित पवार यांचा बारामती दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम का बदलण्यात आला?, या सर्व बाबींबाबत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेत राज्य सरकार, सीएमओ, डिजीसीए, सीआयडीसह रोहित पवारांना प्रतिवादी केले आहे. (Petition in High Court in Ajit Pawar accident case)
या विमान अपघातात बरेचसे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. डीजीसीए, सीएमओ यांना अनेक पत्र पाठविली. माहिती अधिकारात माहिती मागविली होती. मुख्यमंत्री कार्यालयाकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्यामुळे जनहित याचिका दाखल केली आहे
— केतन तिरोडकर (याचिकाकर्ते)