PI transfer : निवडणूक काळात बदल्या केलेल्या २१५ पोलीस निरीक्षक पुन्हा पूर्ववत जागी!

मुंबई : प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने बडगा दाखवल्यानंतर दीड महिन्यापूर्वी हलविण्यात आलेल्या २१५ पोलीस निरीक्षकांच्या पुन्हा त्याच पोलीस घटकांत  बदल्या करण्यात आहेत. निवडणूक आचारसंहिता संपताच राज्य शासनाने हा निर्णय घेतला. पोलीस महासंचालकाकडून बुधवारी रात्री त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात मुंबईतील तब्बल १५५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (PI transfer)

महासंचालक कार्यालयाच्या या निर्णयामुळे निवडणूक आयोगाचे आदेश म्हणजे ‘रात गयी बात गयी,’ असे ठरले असल्याचे चर्चा आता पोलीस वर्तुळातूनच सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमाला शासन कसे बगल देऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबरला झाल्या. त्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलेल्या सूचनेनुसार चार ऑक्टोबर व ३० ऑक्टोबर रोजी मुंबईसह राज्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करून नवनियुक्त ठिकाणी हजर करण्यात आले होते. २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागून महायुती पुन्हा बहुमताने विजयी झाली. पाच डिसेंबरला नवे सरकार स्थापन झाले आहे. (PI transfer)

मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटप अद्याप जाहीर झाले नसले तरीही सध्या गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईबाहेर बदल्या झालेले अनेक अधिकारी नाराज होते. त्यांना नक्षलग्रस्त व दुर्गम भागात पाठवण्यात आले होते. त्यामुळे मुंबईतील अधिकाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन संबंधित अधिकारी पुन्हा मुंबई आयुक्तालयात काम करण्याची संधी द्यावी, अशी त्यांच्याकडून मागणी होत होती. त्याला अनुसरूनच पोलीस महासंचालकाकडून ११ डिसेंबरला राज्यातील २१५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये मुंबईबाहेर बदल्या करण्यात आलेल्या १५५ अधिकाऱ्यांना पुन्हा मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत बदली करण्यात आली आहे. (PI transfer)

अन्य अधिकाऱ्यांच्याही होणार पूर्ववत बदल्या

पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांबरोबरच उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक व उपअधीक्षक, सहायक अधीक्षक, उपायुक्त आदी दर्जांच्या ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना पुन्हा त्यांच्या इच्छेनुसार पूर्ववत घटकांमध्ये बदल्या दिल्या जातील, असे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :

कास, महाबळेश्‍वर, पाचगणीला ‘मे तेरी रानी, तू मेरा…’
बीडचा बिहार झाल्याची विरोधकांची टीका

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ