Georgia death : भारतीय हॉटेलमध्ये १२ जण मृतावस्थेत

नवी दिल्ली : जॉर्जियातील गुडौरी येथील भारतीय रेस्टॉरंटमधील एका धक्कादायक घटनेत १२ जण मृतावस्थेत आढळले. या घटनेचे गूढ अद्याप उकललेले नाही. मृतदेहांवर हिंसेची अथवा झटापटीचे व्रण नाहीत, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व मृत हे रेस्टॉरंटचे कर्मचारी असल्याचे समजते. ते दुसऱ्या मजल्यावर झोपले होते.(Georgia death )

जॉर्जियाच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही घटना निष्काळजीपणाने झाली आहे.  जॉर्जियाच्या फौजदारी संहितेच्या कलम ११६ अंतर्गत घटनेची नोंद करण्यात आली आहे. जवळच्या बंद घरातील जागेत जनरेटर लावल्याचे स्पष्ट झाले आहे. कदाचित आदल्या रात्री वीज खंडीत झाली असावी, त्यामुळे जनरेटर लावलेला असावा, असे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. मृतांमध्ये ११ परदेशी, तर एक जॉर्जियन नागरिक आहे. (Georgia death )

पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ञ घटनास्थळी कसून तपास करत आहेत. ‘मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हायचे आहे. त्यासाठी फॉरेन्सिक वैद्यकीय विश्लेषणाचे आदेश देण्यात आले आहेत, असे अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा :

एका वर्षांत चोरल्या ११ दुचाकी
ईडीच्या छाप्यानंतर उद्योजकाची पत्नीसह आत्महत्या

 

Related posts

Kolhapur Crime : गीता, धनश्रीचे ‘ऑपरेशन गर्भलिंग निदान’

ख्रिस्ती मिशनरीची हत्या, ओरिसा विधानसभेवरील हल्ला आणि खासदार सारंगी

Jaipur Blast; स्फोटांमागे स्फोट; किंकाळ्या नि ज्वाळांत लपेटलेले लोक