Home » Blog » कोल्हापूरात दोन दिवस पाणी पुरवठा बंद

कोल्हापूरात दोन दिवस पाणी पुरवठा बंद

Kolhapur News : पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन

by प्रतिनिधी
0 comments
Kolhapur News

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेच्या वीज वाहिन्यांवरील धोकादायक फांद्या छाटणे व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे मंगळवार (दि.२२) आणि बुधवार (दि. २३) ए.बी. आणि ई वॉर्डातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. (Kolhapur News )

दिवाळीच्या दरम्यान शहरात पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या वीज वाहिन्यांवरील धोकादायक फांद्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये. तसेच काही दिवसांपासून होत असलेल्या वादळी वातावरणाने वीजवाहिन्यांची देखभाल करणे गरजेचे आहे. शहरातील काही वॉर्डमधील पाणीपुरवठा मंगळवारी (दि.२२) आणि बुधवारी (दि.२३) बंद राहणार आहे. मात्र, बालिंगा योजनेवर अवलंबून असणाऱ्या सी आणि डी वॉर्डमधील नागरिकांचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

दिवाळी सणात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पाणी पुरवठा विभागाने आताच ही कामे करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे या वॉर्डमधील नागरिकांनी उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. (Kolhapur News )

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00