Home » Blog » Shahuvadi  : तहसिलदारांच्या नावे पाच लाखाची लाच घेणाऱ्याला अटक

Shahuvadi  : तहसिलदारांच्या नावे पाच लाखाची लाच घेणाऱ्याला अटक

दोन दिवस पोलिस कोठडी

by प्रतिनिधी
0 comments
Shahuvadi

कोल्हापूर : प्रतिनिधी : सातबारा उताऱ्यात खाडाखोड करणाऱ्यावर कारवाई करुन योग्य तो सातबारा देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. सुरेश जगन्नाथ खोत (वय ४९, रा. भैरेवाडी, ता. शाहूवाडी) असे पंटरचे नाव आहे. त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आदेश दिला आहे. (Shahuvadi)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. या गुन्ह्यातील तक्रारदार, त्यांचे मामे भाऊ व सहहिस्सेदार यांनी मौजे सावे येथे जमीन खरेदी केली असून, या जमिनीच्या गट नंबरच्या फेरफारमध्ये खाडाखोड करून त्यामध्ये चुकीचे गट नंबर नोंद केलेले आहेत. अशा प्रकारे फेरफारमध्ये खाडाखोड करणाऱ्याविरुद्ध योग्य ती कारवाई करून पूर्ववत सात-बारा व फेरफार दुरुस्ती करून मिळावा, म्हणून तक्रारदारांच्या नातेवाइकांनी शाहूवाडी तहसिलदार कार्यालयात रितसर अर्ज केला होता. (Shahuvadi)

या अर्जाबाबत शाहूवाडी तहसील कार्यालयात सुनावणी सुरू होती. या सुनावणीचे काम तक्रारदार हे पाहत होते. आपल्या अर्जाबाबत काय निर्णय झाला, याची चौकशी करण्यासाठी शाहूवाडी तहसील कार्यालयात गेल्यानंतर तेथील पंटर सुरेश खोत याची भेट झाली. तुमचे काम मी तहसीलदारांकडून करून देतो; पण त्याबदल्यात तहसीलदारांना देण्यासाठी पाच लाखांच्या लाचेची मागणी केली. (Shahuvadi)
तक्रारदार व त्यांचे नातेवाईक सहहिस्सेदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची खातरजमा करुन पोलिसांनी सापळा रचला.  त्यानुसार बुधवारी सकाळी प्रलंबित काम करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना पंटर सुरेश खोत याला एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष अटक केली. (Shahuvadi)

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, सहायक फौजदार प्रकाश भंडारे, हे.कॉ. विकास माने, संदीप काशीद, सुधीर पाटील, उदय पाटील, प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली. संशयित पंटर सुरेश खोत याच्या भैरेवाडी येथील घराची एसीबीच्या पथकाने झडती घेतली. (Shahuvadi)

हेही वाचा :

 केंद्रीय मंत्र्याच्या भाच्याची हत्या

सुधा मूर्ती, अजिम प्रेमजी यांची नावे वापरून फसवणूक

दिशा सालियन मृत्यूप्रकरण पाच वर्षांनी पुन्हा चर्चेत

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00