Home » Blog » ठाकरेंच्या मुंबईतील २५ वर्षांच्या सत्तेला  सुरुंग? 

ठाकरेंच्या मुंबईतील २५ वर्षांच्या सत्तेला  सुरुंग? 

by प्रतिनिधी
0 comments
Thackeray will lose power in Mumbai

  जमीर काझी : मुंबई  : राज्यासह पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी गुरुवारी मोठया चुरशीने व तणावपूर्ण वातावरणात मतदान झाले. त्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज उघड करण्यात आले असून त्यामध्ये सर्वच कंपन्यांनी भाजप आणि शिवसेना शिंदें गट स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेत येण्याचा दावा केला आहे. त्यांना  १२५ ते १३८ जागा मिळतील  असा अंदाज केला आहे. तर २५  वर्षे सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मनसेला सोबत घेऊनही ५८ ते ६८ जागा मिळवतील आणि काँग्रेस -वंचित आघाडीचे २० ते २५ नगरसेवक निवडून येतील, असा अंदाज वर्तविला आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ठाकरेची मुंबईतील सत्ता खालसा होण्याची शक्यता वर्तविण्यात आला असून शुक्रवारी मतदानाची मतमोजणी झाल्यानंतर स्पष्टता येणार आहे.

  मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी आज सरासरी ५२ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्या आधी विविध कंपन्यांनी सर्व्हे जाहीर केला आहे. त्यामध्ये भाजप आणि शिंदे यांच्या युतीला १३८ जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. त्याचवेळी ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त ५८- ६८ जागा मिळतील. तर काँग्रेस आणि वंचित आघाडीला २० -२५ जागा आणि इतर पक्षांना ७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

———-

जेवीसी एक्झिट पोलनुसार, मुंबईत भाजपची सत्ता येणार असून सर्वाधिक मतदान टक्काही त्या पक्षाला मिळणार आहे. 

या अंदाजानुसार कोणत्या पक्षाला जागा आणि किती टक्के मतदान मिळणार अशी खालीलप्रमाणे, 

भाजप शिंदे – 125-1338

ठाकरे- मनसे – 58-68

काँग्रेस-वंचित – 20-25

इतर – 7

———

मतांची टक्केवारी किती?

महायुती : 42-45%

शिवसेना ठाकरे- मनसे : 34-37%

काँग्रेस- वंचित : 13-15%

इतर : 6-8%

————

 लोकशाही रुद्र रिसर्च एक्झिट पोल

त्याचवेळी लोकशाही आणि रुद्र रिसर्च यांच्याही एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, मुंबईत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला 121 जागा मिळतील. तर ठाकरेंच्या युतीला 71 जागा मिळतील. काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला मुंबईत 25 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

भाजप -शिवसेना – 121

शिवसेना ठाकरे- मनसे – 71

काँग्रेस वंचित – 25

इतर – 10

———

  अक्सिस माय इंडिया मुंबई एक्झिट पोल

भाजप शिंदे – 131- 151

ठाकरे- मनसे – 58-68

काँग्रेस-वंचित – 12-16

इतर – 6-12

मतदानाची टक्केवारी कशी? 

भाजप शिंदे – 42

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00