Home » Blog » शाई पुसली जाणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेवरच आघात : उद्धव ठाकरे

शाई पुसली जाणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेवरच आघात : उद्धव ठाकरे

by प्रतिनिधी
0 comments
The ink on the finger was wiped off

 जमीर काझी :  मुंबई :  जवळपास नऊ वर्षानंतर होत असलेल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरातील २९ महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सकाळपासून अनेक ठिकाणी वाद सुरू झाले आहेत. मतदान केंद्रातून बाहेर पडणाऱ्या मतदारांच्या बोटावरील शाई सहज पुसली जात असल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालेत. प्रत्येक निवडणुकीत शाईचा वापर केला जात असताना या निवडणुकीत मार्करचा वापर कशासाठी? 

असा सवाल उपस्थित करीत शाई पुसली जाणे म्हणजे लोकशाहीवरच आघात आहे, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली

 पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.  ते म्हणाले,’ मुंबईत तब्बल नऊ वर्षांनंतर महानगरपालिका निवडणुका होत असताना प्रशासनाकडून अपेक्षित सुधारणा केल्या नाहीत. मतदानानंतर लावली जाणारी शाई जर पुसली जात असेल, तर बोगस मतदानाला वाव दिला जात आहे का? असा सवाल करीत सकाळपासून मुंबईसह राज्यातील विविध शहरांतून मतदारयादीतील गोंधळाबाबत तक्रारी येत असल्याचे सांगितले. अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे प्रकार समोर येत असून, दुबार मतदारांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यातच मतदानानंतर बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीही येत आहेत. संविधान मतदारांना मतदानाचा हक्क देते, मात्र तो प्रभावीपणे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी निवडणूक आयोग पार पाडत नाही, असे सांगून ते म्हणाले,’ या प्रकरणाची तातडीने चौकशी करून निवडणूक आयुक्तांना निलंबित करावे, ईव्हीएमविषयीचे आक्षेप, मतदार याद्यांतील त्रुटी आणि आता शाई पुसली जाण्याचे प्रकार, हे सत्ताधाऱ्यांच्या अस्वस्थतेचे द्योतक असून मतदारांसमोर जाऊन थेट मते मागण्याऐवजी लोकशाही प्रक्रियेलाच संशयाच्या भोवऱ्यात ढकलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपावर जोरदार टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट उल्लेख करून ते म्हणाले,’पराभवाची भीती स्पष्ट दिसू लागल्याने भाजपाकडून आता ‘रडीचा डाव’ खेळला जात आहे. हिंमत असेल तर थेट जनतेसमोर जाऊन मते मागा. अशा दरोडेखोर पद्धतींनी लोकशाहीचा खून करू नका,” असे आव्हान त्यांनी दिले. याचबरोबर प्रभाग क्रमांक २२६ मधील टपाली मतदानासंदर्भातील हालचाली संशयास्पद असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या प्रकरणामुळे मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाले असून, निवडणूक आयोगाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी राजकीय वर्तुळातून होत आहे. (The ink on the finger was wiped off)

बोटावरील शाई पुसणे पुन्हा मतदान करणे हाच विकास- राज ठाकरे, निवडणूक आयोगाच्यl कारभारावर राज ठाकरे यांनीही तीव्र टीका केली ते म्हणाले,’ मतना मतदानानंतर बोटावरील शाई पुसणे आणि पुन्हा मतदान करणे, हाच विकास झाला आहे. सरकारला निवडणूक जिकूंन देण्यासाठी आयोगाकडून सर्व प्रकारे मदत केली जात आहे. (The ink on the finger was wiped off)

शाई पुसली जाणेबाबत फेक नेरिटिव्ह :निवडणूक आयोग..  बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे., हे फेक निगेटिव्ह पसरवले जात आहे, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केला आहे. विरोधी पक्षाकडून होत असलेल्या आरोपबाबत ते म्हणाले,’ बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. . निवडणुकीसाठी पारंपरिकदृष्ट्या जी शाई वापरली जाते त्याऐवजी मार्कर वापरण्याबाबत ते म्हणाले,“मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०११ रोजी आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी आदेश निर्गमित केलेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी. तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वी देखील देण्यात आल्या असून, आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये,” असे आवाहन आयोगाने केले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00