Home » Blog » Sansadratna : १७ खासदारांना संसदरत्न पुरस्कार

Sansadratna : १७ खासदारांना संसदरत्न पुरस्कार

सुप्रिया सुळे, मेहताब, बारणे, प्रेमचंदन यांची निवड

by प्रतिनिधी
0 comments
Sansadratna

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवाडीवरुन प्राईम पॉईंट फाउंडेशनने संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कार २०२५ ची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राने बाजी मारली असून सात खासदारांचा समावेश आहे.  राष्ट्रीय मागासवर्गआयागाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली ज्युरी समितीने पुरस्काराची निवड केली. (Sansadratna)

भर्तुहारी मेहताब, सुप्रिया सुळे, श्रीरंग अप्पा बारणे,  एन.के. प्रेमचंदन उत्कृष्ट संसदीय लोकशाहीमध्ये उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण योगदान यासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे.  देण्यात आला आहे. १६ आणि १७ व्या लोकसभेत त्यांनी उतकृष्ट काम केल्याबद्दल त्याची निवड झाली आहे. असे प्राईम पॉईंट फाऊंडेशनने म्हटले आहे.

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड,  भाजपच्या मेधा कुलकर्णी, प्रविण पटेल, रवी किशन, स्मिता वाघ, निशिकांत दुबे, विद्युत बरन महातो, पी.पी. चौधरी, मदन राठोड, दिलीप सैकिया, डीमएमकेचे सी.एन. अण्णादुराई यांनाही संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. संसदेत सादर केलेल्या अहवालाच्या आधारे वित्त आणि कृषी या दोन स्थायी समितींचीही निवड करण्यात आली आहे. (Sansadratna)

भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आग्रहाखातर प्राइम प्वाइंट फाउंडेशनने हा पुरस्कार सुरू केला. २०१० ला या पुरस्काराचे अब्दुल कलाम यांनी उद्घाटन केले. दरवर्षी संसदेत आपल्या कामाची छाप पाडणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार दिला जातो. केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे अनेक सदस्य या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करत असतात. हा एक प्रकारचा नागरी सन्मान समजला जातो. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात. (Sansadratna)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00