Home » Blog » Khalid ka Shivaji : ‘कान्स’ यादीतून सरकारनेच केला ‘खालिद का शिवाजी’ रद्द

Khalid ka Shivaji : ‘कान्स’ यादीतून सरकारनेच केला ‘खालिद का शिवाजी’ रद्द

by प्रतिनिधी
0 comments
Khalid ka Shivaji

मुंबई : ‘खालिद का शिवाजी’ सिनेमा ‘कान्स’साठी पाठविण्यात आला होता. मात्र सिनेमावर काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर सरकारनेच ‘कान्स’च्या यादीतून हा सिनेमा बाद करून टाकला आहे. सरकारने यादीतून हा सिनेमा काढून टाकला आहे. (Khalid ka Shivaji)

यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या सिनेमामुळे भावना दुखावल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे तर मग आधी तो ‘कान्स’ला पाठवलाच कसा?, असा सवाल विरोधकांनी केला आहे. (Khalid ka Shivaji)

हा सिनेमा आम्ही ‘कान्स’ला पाठवला होता ही वस्तुस्थिती आहे. विशेष समितीने हा सिनेमा सुचविण्यात आला होता. मी त्याची केवळ घोषणा केली होती, असे स्पष्टीकरण राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहे. आता या सिनेमासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. सरकारने ‘कान्स’ला हा सिनेमा काढून टाकण्यासाठी ईमेल पाठवला आहे. त्याचबरोबर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (सीबीएफसी) या सगळ्याचा पुनर्तपास केला आहे. चित्रपटाशी संबंधित लोकांना नोटीस बजावल्याचेही शेलार यांनी सांगितले.

‘खालिद का शिवाजी’ या मराठी सिनेमात खोटा इतिहास सांगितला जात असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे..

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांची पहिलीच मराठी फिचर फिल्म ‘खालिद का शिवाजी’ची ‘कान्स’ फिल्म फेस्टिव्हल २०२५ मधील प्रतिष्ठित ‘मार्शे दु फिल्म’ (Marché du Film) या विभागासाठी निवडण्यात आली होती. (Khalid ka Shivaji)

चित्रपटात काही असत्य दाखवल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर शासन त्यावर कारवाई करेल. शासन शिवप्रेमींबरोबर आहे. तसेच ज्या लोकांनी हा चित्रपट कान्सला पाठवला त्या समितीची चूक आम्ही दुरुस्त करत आहोत.
आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य मंत्री

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00