- मनीष सिंग
फॅसिझम म्हणजे केवळ एका नेत्याची, एका पक्षाची आणि एका विचाराची सत्ता, असा समज अनेकदा करून घेतला जातो. पण ही फॅसिझमची अपुरी समज आहे.
फॅसिझमची खरी ओळख समाजात त्याने उभ्या केलेल्या हिंसक साथीदारांच्या जाळ्यातून होते.
खासगी सेनांचे कवच
हे जाळे त्याने स्वतः शिकवलेल्या, घडवलेल्या आणि तयार केलेल्या लोकांचे असते.
सत्तेचा त्यांच्याशी थेट संबंध नसतो. त्यांना स्वतंत्र संघटना, स्वतंत्र चेहरा आणि स्वतंत्र भाषा दिली जाते. त्यांना सर्वसामान्य माणसांसारखेच वावरण्यास सांगितले जाते.
मात्र सत्तेला गरज भासली की हत्या, हल्ले, मारहाण, धमक्या आणि शिवीगाळ करण्यासाठी त्यांना तयार ठेवले जाते.
हेही वाचाः तो काळ जागल्यांचा !
एखाद्या देशात फॅसिझमला सत्तेपर्यंत पोहोचवण्यात आणि त्यानंतर सत्ता टिकवून ठेवण्यात रस्त्यांवरील हिंसक टोळ्या मोठी भूमिका बजावतात.
या नियमित लष्कर नसतात,
पोलीस नसतात,
गुप्तचर संघटना नसतात.
या पक्षाशी मागून जोडलेल्या खासगी सेना असतात. धर्म, देश किंवा एखाद्या जात-समूहाच्या रक्षणाच्या घोषणा त्या देतात. सरकार त्यांना पगार देत नाही. मात्र सरकारच्या जवळचे उद्योगपती, श्रीमंत नेते आणि सरकारमध्ये बसलेले लोक त्यांना पूर्ण संरक्षण देतात.
हेही वाचाः bangla desh protest : शेख मुजीबुर रहमान यांचे निवासस्थान पेटवले
मनमोकळेपणाने मदत करतात. कमाईच्या संधी उपलब्ध करून देतात. गुन्हे करण्याची मुभा देतात, सुरक्षा देतात. आणि त्यांच्या कृत्यांचे समर्थनही करतात.
पहिला टप्पा अराजकतेचा
इटली, जर्मनी आणि स्पेनचा इतिहास सांगतो की पहिला टप्पा अराजकतेचा असतो. हे गुंड हिंसा, दंगे आणि अस्वस्थता पसरवतात. कायद्याऐवजी रस्त्यावरच निर्णय घेऊ लागतात.
विरोधकांच्या सभा, कामगार संघटना, शांततापूर्ण निदर्शने, लेखक, विचारवंत आणि वर्तमानपत्रांवर हल्ले करतात. त्यानंतर त्यांची राजकीय शाखा म्हणते की देशावर कठोर नियंत्रण असण्याची गरज आहे. आणि मग ती स्वतःला राष्ट्रवादी पर्याय म्हणून पुढे करते.
सरकार निष्पक्ष आणि निर्भय असेल, तर अशा टोळ्या टिकू शकत नाहीत. पण फॅसिस्ट व्यवस्था सत्तेत येताच राज्ययंत्रणा एका बाजूने चालू लागते.
पोलीस गुन्हे दाखल करत नाहीत. न्यायालये विलंब करतात. त्यानंतर सौम्य शिक्षा देतात. प्रचारयंत्रणा हल्लेखोरांना देशभक्त ठरवते. आता हिंसा हा गुन्हा राहत नाही.
ती राजकारणाचे हत्यार बनते.
शिक्षेपासून मुक्तीची हमी
१९२०च्या आसपास मुसोलिनीच्या स्क्वाड्रिस्ती पथकाकडून हल्ले होत असताना राजाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना देशभक्त मानून कारवाईपासून दूर ठेवले. राजाने आणीबाणी लागू करण्याऐवजी मुसोलिनीला सत्ताच देऊन टाकली.
हेही वाचाः नरेंद्र मोदींना हरवता येऊ शकतं… !
त्यानंतर मुसोलिनीचे गुंड MVSN बनून सरकारचा भाग झाले. पुढची वीस वर्षे तोच धुमाकूळ सुरू राहिला.
जर्मनीतही याच पद्धतीची पुनरावृत्ती झाली. हिटलरची SA रस्त्यांवर हिंसा पसरवत राहिली. सरकारमध्ये बसलेले त्यांचे लोक त्यांच्याशी नरमाईने वागत राहिले. १९३३ मध्ये हिटलर चॅन्सलर झाला, तेव्हा हे लोकही सरकारची एक शाखा बनले.
हिंसक आणि अराजक निर्माण करणा-या लोकांना आपले पुढचे पथक बनवून घेणे हा स्वस्त आणि सोपा मार्ग असतो. त्यांना मिळणारी सर्वांत मोठी सरकारी मदत पैसा नसतो; ती असते अभयदानाची. उच्चपदस्थ लोकांची छुपी प्रशंसा असते.
शिक्षेपासून मुक्तीची हमी असते.
एका बाजूची हिंसा देशभक्ती मानायची आणि दुसऱ्या बाजूचे राजकारण गुन्हा ठरवायचे, यामुळे समाजाचा समतोल बिघडतो. भीती पसरते. अधिकारी, न्यायाधीश आणि संपूर्ण सरकारी यंत्रणा स्वतःला असुरक्षित समजू लागते.
त्यानंतर निवडणुका, संसद आणि न्यायालये हळूहळू कमजोर होत जातात. एक वेळ अशी येते की हेच गुंड हातात लाठ्या घेऊन पोलिसांच्या पुढे चालताना दिसतात आणि मुलांची डोकी फोडतात. फॅसिझमची खरी ओळख त्यातून पटू लागते.
स्वतंत्र भारद्वाजचा मुद्दा
प्रश्न केवळ स्वतंत्र भारद्वाजसारखे गुंड सरकारच्या बाजूने का उभे आहेत, एवढाच नाही. प्रश्न हा आहे की राज्य त्यांना गुन्हेगार का मानत नाही?
फॅसिझममध्ये हिंसा तेव्हा अधिक बळकट होते, जेव्हा कायदा आणि व्यवस्था एका डोळ्यावर पट्टी बांधतात. पण इथे स्वतंत्र भारद्वाजसारख्या मूर्खांसाठी आणखी एक धडा आहे.
या टोळ्या सुरुवातीला सत्तेची हत्यारे असतात. नंतर त्यांच्यात इतका अहंकार भरतो की त्या स्वतःच निर्णय घेऊ लागतात. स्वतःला सरकारपेक्षा वरचे समजू लागतात. आपल्या कारवायांसाठी वरून इशारा मिळण्याची वाटही पाहत नाहीत.
आपल्या दुष्कृत्यांचा छातीठोकपणे प्रचार करतात.
तेव्हा त्या आपल्या संरक्षकांसाठीच अडचणीच्या ठरतात. १९३४ मध्ये हिटलरने SAचा नेता अर्न्स्ट रोहम याची हत्या करवून त्याचा मृतदेह गटारात फेकून दिला. त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांनाही मारण्यात आले. त्याच्या कॅडरला नव्या SS संघटनेत सामावून घेण्यात आले.
उपयोगी असतात तोवरच मदत
म्हणजेच व्यवस्था त्यांना मदत करते ती प्रेम, उद्दिष्टांची एकता किंवा सहकार्याच्या भावनेमुळे नव्हे. त्यांना सुरक्षा मिळते ती जोपर्यंत ते उपयोगी आहेत आणि आपल्या मर्यादेत आहेत तोपर्यंतच.
असो, तो काळ येईलच, जेव्हा स्वतंत्र भारद्वाजसारखे लफंगे कायद्याच्या कचाट्यात सापडतील. तेव्हा त्यांची संघटना आणि त्यांचे संरक्षक त्यांना ओळखण्यासही नकार देतील.
जसे त्यांनी संघटनेचा निष्ठावान सैनिक ‘हुतात्मा’ नथुराम गोडसे यालाही आपला सदस्य मानण्यास नकार दिला होता.