कोल्हापूर : प्रतिनिधी : ढगफुटी आणि मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. खासदार सुळे या कोल्हापूर दौऱ्यावर आल्या आहेत. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून त्यांनी आज सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून राज्य सरकारावर टीका केली. (Sule’s demand)
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार साफ दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत खासदार सुळे म्हणाल्या, राज्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन महिन्यापासून आम्ही राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफीची मागणी करत आहोत. मात्र सरकारने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. (Sule’s demand)
संसदेच्या अधिवेशनात सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही केली होती. राज्यावर संकट आल्यावर मदतीसाठी केंद्राकडे पाहावे लागते. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री यांच्याकडे आम्ही अशी विनंती केली होती की त्यांनी महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यास सांगावे. पण हे सरकार असंवेदनशील असल्याची टीका सुळे यांनी केली. (Sule’s demand)
मागील वर्षी कोल्हापूरात याच सरकारने कृषी मालाला हमीभाव आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अन्नधान करणार शेतकरी आज अडचणीत आहे. सरकारने जर वेळेवर दखल घेतली नाही, तर आम्ही रस्त्यांवर उतरुन लढाई करू असा राज्य सरकारला इशारा दिला.