Home » Blog » Kamara : कुणाल कामराला अटक करता येणार नाही

Kamara : कुणाल कामराला अटक करता येणार नाही

मुंबई हायकोर्टाचा कामराला दिलासा

by प्रतिनिधी
0 comments
Kamara

मुंबई : प्रतिनिधी : राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणे तयार करणाऱ्या कुणाल कामरा याला मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कुणाल कामराला अटक करता येणार नाही असे निरीक्षण नोंदवले आहे. पुढील आदेश येईपर्यंत कुणाल कामरा याच्यावर अटकेची कारवाई करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेशही न्यायालयाने दिले आहे. (Kamara)

कुणाल कामरा याच्या अटकेसाठी मुंबई पोलिस आग्रही होते. खार पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवण्यासाठी दोन वेळा समन्स पाठवले आहे. पण कुणाल कामरा हजर राहिला नाही. त्याने मद्रास हायकोर्टात धाव घेतली. मद्रास हायकोर्टाने कामराला अटकेपासून सरंक्षण दिले. पण मद्रास हायकोर्टाने अटकेपूर्वी जामिनासाठी मुंबई हायकोर्टात जावे लागेल असे स्पष्ट निर्देश दिले होते. (Kamara)

मद्रास हायकोर्टाच्या आदेशानुसार कामराने मुंबई हायकोर्टात त्याच्या वकिलामार्फेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. आज बुधवारी हायकोर्टात जामिन अर्जावर सुनावणी झाली. कुणाल कामराला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा युक्तिवाद कामराच्या वकिलांनी केला. तो जबाब देण्यासाठी मुंबईत आला तर त्याच्या जीवाला धोका असल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले. सरकारच्यावतीने हितेन वेणुगोपाल यांनी युक्तिवाद केला. यावेळी न्यायालयाने मुंबई पोलिसांना कुणाल कामराच्या सुरक्षिततेची काळजी घेणार का असा सवालही केला. फिर्यादी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकूण न्यायालयाने कुणाल कामरांना अटक करता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवले. (Kamara)

हेही वाचा :

‘वक्फ’ विरोधात आंदोलनातील हिंसाचार वेदनादायी

रिल्स स्टारकडून पतीचा खून

प्राचार्याच्या डोक्यातील शेणाचा प्रयोग

You may also like

error: Content is protected !!