Home » Blog » Six dancers attempt suicide : कोल्हापुरात सहा नृत्यांगणांचा आत्महत्येचा प्रयत्न

Six dancers attempt suicide : कोल्हापुरात सहा नृत्यांगणांचा आत्महत्येचा प्रयत्न

by प्रतिनिधी
0 comments
Six dancers attempt suicide

कोल्हापूर : प्रतिनिधी : महिला सुधारगृहातील सहा महिला नृत्यांगणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलांनी एकत्रित हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. त्यांच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. (Six dancers attempt suicide)

करवीर तालुक्यातील कळंबा येथील स्वप्नहिल फॉर्म हाऊसमध्ये अनैतिक मानवी व्यवहार प्रतिबंधक कक्ष  पथकांच्या पोलिसांनी छापा टाकून सहा नृत्यांगणासह सात जणांना अटक केली होती. न्यायालयाने सातही नृत्यागणांना महिला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. गेले दोन महिन्यापासून त्या सुधारगृहात आहेत. त्यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे पण त्यांचा जामिनासाठीचा अर्ज फेटाळण्यात येत होत्या. त्यामुळे सहा महिला नैराश्यात गेल्या होता. शुक्रवारी सकाळी त्यांनी हाताचा नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. (Six dancers attempt suicide)

दोन महिन्यापूर्वी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात या महिला बारबाला असल्याची चर्चा होती. पण त्यांना वेश्यागमनासाठी आणले होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे.  त्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. सहा संशयितांनी त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले होते. पोलिसांनी फॉम हाऊसवरुन रोख ८९ हजार ५५ रुपये, पाच मोबाईल आणि साहित्य जप्त केले होते.  (Six dancers attempt suicide)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00