Home » Blog » अमिर खानचा भाचा इमरान खानला देश सोडण्याचे आदेश

अमिर खानचा भाचा इमरान खानला देश सोडण्याचे आदेश

by प्रतिनिधी
0 comments
Actor Imran Khan ordered to leave the country

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता इमरान खान याला भारत सोडण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. इमरान खान हा अभिनेता अमिर खान याचा भाचा असून तो अमेरिकेचा नागरिक आहे. पोलिसांच्या कारवाई शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. इमरान खानवर कारवाई होत असेल तर जे भारतीय नागरिक नाहीत अशा अक्षयकुमारवर काय कारवाई करणार असा सवाल केला आहे. (Actor Imran Khan ordered to leave the country)

किरीट सोमय्याकडून इमरान खानच्या हकालपट्टीची मागणी

मुंबईत १० ऑक्टोबर रोजी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात अभिनेता इमरान खान सहभागी झाला होता. आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतले होते. आंदोलन सहभाग घेतल्याबद्दल आणि तो अमेरिकेचा नागरिक असल्याने २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. इमरान खान हा ओसीआय कार्डधार असून त्याची भारतातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती. आंदोलनात सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना इम्रान खान याने प्रतिक्रिया दिली होती. कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मी आलेलो नाही. या शहरात राहणारा एक नागरिक म्हणुन आलो होतो. नागरिकांच्या मुलभूत स्वातंत्र्यावर आणि आवाजावर गदा का आणली जात आहे हे पाहण्यासाठी उपस्थित होतो अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. (Actor Imran Khan ordered to leave the country)

अक्षयकुमारवर कारवाई का नाही?

इम्रान खान याला पाठवलेल्या नोटिसीबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस सरकार काय करु शकते हे दिसून येते. इमरान खान याने तरुणांच्या बाजुने आवाज उठवला म्हणून त्याला देश सोडायला सांगितला. मग बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना देश सोडून जायला का सांगत नाहीत? अक्षयकुमारासह अनेक बॉलिवूड कलाकार परदेशी नागरिक आहेत. त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल केला आहे. (Actor Imran Khan ordered to leave the country)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!