कोल्हापूर : प्रतिनिधी : गंगा नदीत बोट उलटून १३ निष्पाप मुलांचा मृत्यू झाला. शेजारच्या गावात जेवायला जात असताना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील राघोपूर दियारा भागातील रामपूर श्यामचंद गावाजवळ ही घटना घडली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी शोक व्यक्त करत मदतीची घोषणा केली आहे. (A boat capsized near Rampur Shyamchand village in Bihar)
शेजारच्या गावात एका श्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्त जेवणावळीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी वीस मुले बोटीतून जातहोती. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने बोट उलटली. त्यामध्ये अनेक मुले बुडाली. सात जणांना एसडीआरएफने बाहेर काढले. त्यांना नालंदा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. मयत झालेली १३ मुले ही पंधरा वर्षाखालील आहेत. त्यामुळे गावांवर शोककळा पसरली आहे. (A boat capsized near Rampur Shyamchand village in Bihar)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रयेकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखांची मदत केली आहे. बिहारचे विरोध पक्षनेते आमदार तेजस्वी यादव यांनीही घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. (A boat capsized near Rampur Shyamchand village in Bihar)