Home » Blog » इमारतीच्या १४ व्या मजल्याला आग: दोन महिलांचा मृत्यू

इमारतीच्या १४ व्या मजल्याला आग: दोन महिलांचा मृत्यू

by प्रतिनिधी
0 comments
Fire breaks out in a multi-storey building in Nalasopara

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबईतील नालासोपारा-वसई लिंक रोडवरील इम्पिरियल हाईट्स या बहुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला. तर अग्निशमन दलाने १५ जणांची सुखरुप सुटका केली. (Fire breaks out in a multi-storey building in Nalasopara)

मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या १४ व्या मजल्यावर आग लागली. आगीची घटना कळताच वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचावकार्य सुरू करत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीपासून बचाव करण्यासाठी एकाच कुटुंबातील चौघे इमारतीच्या बाहेरील जागेत ४० ते ५० मिनिटे मदतीसाठी प्रतिक्षा करत होते. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी क्रेनच्या सहाय्याने चौघांची सुखरुपय सुटका केली. (Fire breaks out in a multi-storey building in Nalasopara)

आगीवर नियंत्रण मिळवत अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील १५ जणांना बाहेर काढले. तरीही या दुर्घटनेत फाल्गुनी शाह (वय ५०) आणि अश्विनी पारकर (वय ५०) या दोन महिलांचा मृत्यू झाला. आगीच्या धुरामुळे गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. घटनास्थळी महापौर रुपेश जाधव यांनी भेट दिली. (Fire breaks out in a multi-storey building in Nalasopara)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!