कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामास आज सुरुवात झाली. केएसए अ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि वर्षा विश्वास संघांनी विजयी सलामी दिली. शिवाजी तरुण मंडळाने संध्यामठ तरुण मंडळावर ६-१ असा दणदणीत विजय मिळवला. तर वर्षा विश्वास तरुण मंडळाने धक्कादायक विजयाची नोंद करताना पहिल्याच सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा १-० असा पराभव केला. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने स्पर्धेचे आयोजन केले आहे. (Kolhapur Football)
शिवाजी आणि संध्यामठ यांच्यातील सामन्यावर शिवाजी तरुण मंडळाचे वर्चस्व होते. पूर्वाधात शिवाजीने ३-० अशी आघाडी घेतली होती. दर्शन पाटीलने सहाव्या, देवराज मंडलिकने २९ तर संकेत नितिन साळोखेने ३१ व्या मिनिटाला गोल केले. उत्तरार्धात शिवाजीचा झंझावात कायम राहिला. विशाल पाटीलने ६४ व्या मिनिटाला गोला केला तर सिध्देश साळोखे ७३ आणि ७९ व्या मिनिटाला सलग दोन करत शिवाजीच्या मोठ्या विजयात मोलाची भर घातली. संध्यामठकडून एकमेव गोल इलेंन्स शर्माने ७८ व्या मिनिटाला केला. (Kolhapur Football)
तत्पुर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात बलाढ्य फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ संघ वर्षा विश्वास संघांकडून १-० असा गोलफरकाने पराभूत झाला. वर्षा विश्वासच्या शिवम लोकरने ३८ व्या मिनिटाला गोल केला. उत्तरार्धात गोल फेडण्याचे फुलेवाडीने जोरदार प्रयत्न केले पण वर्षा विश्वास संघाने भक्कम बचाव केला.
स्पर्धेचे उद्घाटन ऑल इंडिया फुटबॉल संघटनेचे सदस्य, विफाचे उपाध्यक्ष आणि केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूर्यकुमार झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी विफा महिला संघटनेच्या अध्यक्षा मधुरिमाराजे, उद्योगपती तेज घाटगे, यशस्वीनी राजे, यश राजे, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, नील पंडीत प्रा. अमर सासने, नंदुकुमार बामणे, संभाजीराव मांगोरे पाटील, विश्वंभर मालेकर, नितीन जाधव, प्रदीप साळोखे, भाऊ घोडके, दिग्विजय राजेभोसले, संग्रामसिंह यादव, संजय पोरे. मनोज जाधव यांच्यासह १६ संघांचे अध्यक्ष उपस्थित होते. (Kolhapur Football)
शुक्रवारचे सामने, प्रॅक्टिस क्लब वि. बीजीएम स्पोर्टस्, दुपारी २ वा. दुसरा सामना, पाटाकडील तालीम मंडळ अ दिलबहार तालीम मंडळ अ, दुपारी चार वाजता . (Kolhapur Football)
हेही वाचा :