मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेसाठी शिवसेनेने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उमेदवारी जाहीर केली. दानवेंना उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसने उमेदवारी देण्याची तयारी केली असून आज रात्री किंवा गुरुवारी उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने चर्चा न करता उमेदवारी जाहीर केल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. १२ मे रोजी नऊ जागांसाठी विधान परिषदेची निवड होणार आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांची उमेदवारी निश्चित होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलो होता. विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे, माजी खासदार विनायक राऊत, राजन विचारे, माजी आमदार वैभव नाईक, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा होती. पण शिवसेनेने अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली आहे. दानवे उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता अर्ज दाखल करतील अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. (Shiv Sena fields Ambadas Danve as its candidate)
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्ष दहावा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवणार आहे. त्यामुळे नऊ जागासाठी असलेली निवडणूक बिनविरोध होणार नसल्याची चर्चा आहे. जर निवडणूक लागली तर घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीत असून पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता आहे. (Shiv Sena fields Ambadas Danve as its candidate)
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी १२ मे रोजी निवडणूक होणार आहे. तर एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी २९ मताची गरज आहे. विधानसभेतील पक्षनिहार संख्याबळ पाहता नऊ पैकी पाच जागा भाजपला, शिवसेना शिंदे गटाचे दोन, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. (Shiv Sena fields Ambadas Danve as its candidate)