Home » Blog » SC denies relief to Kangana : कंगनाच्या अडचणीत वाढ

SC denies relief to Kangana : कंगनाच्या अडचणीत वाढ

by प्रतिनिधी
0 comments
SC denies relief to Kangana

नवी दिल्ली : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढल्या आहेत. शेतकरी आंदोलनावर केलेल्या टिप्पणीप्रकरणी मानहानीची तक्रार रद्द करण्याची तिची याचिका शुक्रवारी (१२ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. (SC denies relief to Kangana)

केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध २०२०-२१ च्या शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन उभारले होते. त्या आंदोलनाशी संबंधित संबंधित रिट्विटवरून कंगनावर मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ती रद्द करण्याची मागणी तिने याचिकेद्वारे केली आहे. (SC denies relief to Kangana)

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करण्यास अनिच्छा व्यक्त केली. तसेच ट्रायल कोर्टासमोर पर्यायी उपायांचा अवलंब करू शकतात, असे सांगत राणौत यांच्या वकिलांना ती मागे घेण्याची परवानगी दिली.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर भाजप नेत्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी असे म्हटले होते की, त्यांनी कथित बदनामीकारक पोस्ट चांगल्या भावनेने केली होती हे सिद्ध करण्यात त्या अपयशी ठरल्या आहेत. उच्च न्यायालयाने पुढे असे निरीक्षण नोंदवले की, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असलेली सार्वजनिक व्यक्ती म्हणून, ‘‘त्यांनी केलेल्या टिप्पण्यांची सत्यता पडताळण्याची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.’’ (SC denies relief to Kangana)

सुनावणीच्या सुरुवातीला, न्यायमूर्ती मेहता यांनी अभिनेत्याच्या टिप्पण्यांबद्दल आक्षेप व्यक्त केले. “तुमच्या टिप्पण्यांबद्दल काय? ते साधे रिट्विट नव्हते. तुम्ही स्वतःच्या टिप्पण्या जोडल्या आहेत. तुम्ही मसाला वाढवला आहे,” असे त्यांनी म्हटले.

त्यांच्या वकिलांनी असे म्हटले की पोस्टबाबत स्पष्टीकरण आधीच जारी केले गेले आहे. यावर न्यायमूर्ती मेहता यांनी उत्तर दिले की स्पष्टीकरण ट्रायल कोर्टासमोर ठेवता येते. ‘‘या ट्विटचा अर्थ रद्द करण्याच्या याचिकेत विचारात घेता येत नाही. ट्रायल कोर्टासमोर स्पष्टीकरण द्या,’’ असे न्यायाधीश म्हणाले.

जेव्हा त्यांच्या वकिलांनी अधिक युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा खंडपीठाने इशारा दिला की खटल्यादरम्यान त्यांच्या बचावाला बाधा पोहोचू शकेल अशी निरीक्षणे करणे बंधनकारक असू शकते. ‘‘ट्विटमध्ये काय लिहिले आहे यावर आम्हाला टिप्पणी करण्यास सांगू नका. ते तुमच्या खटल्याला बाधा पोहोचवू शकते. तुमचा वैध बचाव असू शकतो,’’ असे न्यायमूर्ती मेहता पुढे म्हणाले.

त्यानंतर त्यांच्या वकिलांनी याचिका मागे घेण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर खंडपीठाने प्रकरण ‘‘मागे घेतल्यानुसार ते फेटाळले’’ असे नोंदवले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00