Home » Blog » Raut’s criticism of BJP : भाजपवाले संकटमोचक नसून दरोडखोर : संजय राऊत

Raut’s criticism of BJP : भाजपवाले संकटमोचक नसून दरोडखोर : संजय राऊत

by प्रतिनिधी
0 comments
Raut's criticism of BJP

मुंबई : प्रतिनिधी : शेतकऱ्यांना मदत देण्याची वेळ आली की भाजपवाले पळून जातात. ते संकटमोचक नसून दरोडखोर आहेत, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला.

खासदार राऊत म्हणाले, मुंबईतील एसआरए प्रकल्पातील भ्रष्टाचार लक्षात घेता भाजपकडे पाच ते दहा हजार कोटी सहज मिळतील. लाडक्या बिल्डरांच्या नेमलेल्या टोळा, एसआरएवाले लाडके बिल्डर यांच्याकडून लूट सुरू आहे. मात्र मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही. या भीषण परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याची वेळ आली की भाजपचे सर्व लोक पाठ दाखवून पळून जातात. त्यावेळी भाजपवाले संकटमोचक नसून दरोडखोर असतात. अशी टीका खासदार राऊत यांनी केली. (Raut’s criticism of BJP)

जाहिरात करुन मदत वाटपावरही खासदार राऊत यांनी टीका केली. राज्याचे मुख्यंत्री आणि उप मुख्यमंत्री यांना प्रसिद्धी करण्याची गरज नाही. शासन म्हणून मोठा प्रमाणात मदत केली पाहिजे आणि इतर मदत गुप्तपणे करण्यात यावी. मराठवाड्यातील भीषण परिस्थिती लक्षात घेता केंद्राने मदत केली पाहिजे. मराठवाड्यात केंद्राने कोणते पथक पाठवले?असा सवालही त्यांनी केला. (Raut’s criticism of BJP)

पैशाचे सोंग आणता येत नाही या अजित पवार यांच्या वक्तव्याचाही राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. पैशाचे सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका. ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे. त्यांनी लाडक्या बहिणींचा उल्लेख करु नये. या पुरात लाडक्या बहिणींचे संसार वाहून गेले आहेत. पैशाचे सोंग आणता येत नाही, असे सांगण्याची वेळ सरकारच्या दरोडखोरीमुळे आली आहे असा आरोपही त्यांनी केला. (Raut’s criticism of BJP)

कोरोनाच्या काळात पीएम केअर फंडाला पैसे का दिले

कोरोनाच्या काळात एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्याचे ठरले होते. पण भाजपने आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता फंडात भ्रष्टाचार होऊ देणार नाही असे सांगत पीएम केअर फंडात पैसे पाठवले होता. आता मात्र ते मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे देत आहेत. ही लोक ढोंगी आणि बकवास आहेत अशी टीका राऊत यांनी  केली. (Raut’s criticism of BJP)

You may also like

error: Content is protected !!