Home » Blog » Khawaja Asif : अस्तित्वाला धोका असेल तरच अण्वस्त्रांचा वापर

Khawaja Asif : अस्तित्वाला धोका असेल तरच अण्वस्त्रांचा वापर

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ

by प्रतिनिधी
0 comments
Khawaja Asif

नवी दिल्ली : आमच्या अस्तित्वाला थेट धोका असेल तरच पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करेल, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, ‘‘आम्ही आमचे सैन्य सज्ज ठेवले आहे. कारण भारताचा हल्ला अटळ दिसतो आहे. अशा परिस्थितीत काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, म्हणून ते निर्णय घेतले गेले आहेत,’’ असे आसिफ यांनी म्हटले आहे. (Khawaja Asif)

त्यांनी सांगितले की पाकिस्तान ‘‘हाय अलर्टवर आहे आणि जर आमच्या अस्तित्वाला थेट धोका असेल तरच पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करेल.’’

जम्मू आणि काश्मीरच्या शांततेला धोका निर्माण करणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारत सरकार निर्णायक कारवाईची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर आसिफ यांचे हे वक्तव्य आले आहे. (Khawaja Asif)

जम्मू आणि काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या रक्तरंजित दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. यातील बहुतेक सर्वजण पर्यटक आहेत.

राजनाथ सिंह यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

दरम्यान,  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांची सरकारी निवासस्थानी भेट घेतली.

संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती संरक्षणमंत्र्यांना दिल्यानंतर ही बैठक झाली. तीन दिवसांपूर्वी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ही चर्चा झाली. यामध्ये हल्ल्यानंतर सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. (Khawaja Asif)

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बैसरन येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यात २६ जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

२०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर हा या प्रदेशातील सर्वात घातक हल्ल्यांपैकी एक होता. त्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले होते. (Khawaja Asif) राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकांनी २३ एप्रिलपासून हल्ल्याच्या ठिकाणी तैनात केले आहे, पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत.

हेही वाचा :
सिंधू जलकरार स्थगितीचे नेमके काय परिणाम?
‘शरिया न्यायालया’ला कायदेशीर मान्यता नाही

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00