Home » Blog » Ravindra Chavan: भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण

Ravindra Chavan: भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण

by प्रतिनिधी
0 comments

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची मंगळवारी (१ जुलै) बिनविरोध निवड झाली. केंद्रीय संसदीय कार्य व अल्पसंख्याक विकासमंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. (Ravindra Chavan)

या निवडीबद्दल आ. चव्हाण यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चारवेळा निवडून आले आहेत. तसेच त्यांचा तळागाळातील भाजपा कार्यकर्त्यांबरोबर दांडगा जनसंपर्क असल्याचे सांगितले जाते. (Ravindra Chavan)

काही दिवसांपूर्वीच चव्हाण यांच्यावर भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे चव्हाण यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

भाजपाने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात चव्हाण यांच्या निवडीची घोषणा किरेन रिजिजु यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत केवळ चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.

भाजपा हीच माझी ओळख !

आमदार चव्हाण यांनी निवडीनंतर आपल्या भावना त्यांच्या ‘एक्स’वर व्यक्त केल्या आहेत. त्यात ते म्हणतात, ‘‘२५ वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या भारतीयत्व जपणाऱ्या विशाल विचारधारेत सामील झालो. आपली विचारधारा विशाल गंगेप्रमाणे पवित्र आणि प्रवाही आहे. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा विचार देणाऱ्या गंगेने मुख्य प्रवाहात मला सामावून घेतले. या विचारधारेने सामाजिक भान दिलं, आयुष्याच्या वळणावर मार्गक्रमण करण्याचं ध्येय दिलं, जगण्याची दिशा दिली. आपल्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने जर विचारधारेचे रक्षण केले तर विचारधारा तुमचे रक्षण करेल, हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो.’’ (Ravindra Chavan)

पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ तसेच लोकांचे शुभाशीर्वाद हेच माझे बलस्थान आहे आणि त्याचसोबत सर्वांचे प्रेम आणि विश्वास या शिदोरीच्या बळावरच प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारत आहे. यापुढील प्रवासातही तुम्हा सर्वांचा स्नेह, विश्वास आणि आपुलकी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.

 आज भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो, ही संघटनेची ताकद आहे. अशी ताकद भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मिळो यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन ही ग्वाही देतो, असे त्यांनी म्हटले आहे.

विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात
रविंद्र चव्हाण विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय होते. २००० मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आणि ते स्थायी समितीचे अध्यक्षही झाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते डोंबिवली मतदारसंघातून निवडून आले. सलग चार वेळा ते या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. २०१६ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते मंत्रीही होते. (Ravindra Chavan)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00