Home » Blog » Rashtrawadi  Melava : प्रदेशाध्यक्षपदापासून मुक्त करा : जयंत पाटील

Rashtrawadi  Melava : प्रदेशाध्यक्षपदापासून मुक्त करा : जयंत पाटील

by प्रतिनिधी
0 comments
Rashtrawadi Melava

पुणे : प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन मेळाव्यात प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची मागणी केली. सात वर्षे मी या पदावर आहे. आता नवीन व्यक्तीला संधी द्यावी असे मतही मांडले. (Rashtrawadi  Melava)

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच पुणे येथे राष्ट्रवादी स्थापना दिनानिमित्त दोन्ही गटाचे वेगवेगळे मेळावे होत आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होत आहे. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
जयंत पाटील म्हणाले, मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबंना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असेही ते म्हणाले. (Rashtrawadi  Melava)

जयंत पाटील म्हणाले, १९९९ पासून २०१४ पर्यंत राष्ट्रवाद काँग्रेस पक्ष सत्तेत राहिला. पक्षातील सगळ्या धोरणांना वाढवण्याचे काम झाले. पण २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यावर बरेच लोक आमच्या रेल्वेतून उतरुन दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसायलालागले, पण आपण सर्वजण पवारसाहेबांच्याशी निष्ठेने राहिलो. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहिल्याबद्दल जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

शरद पवारांच्या धाडसी गुणांचे कौतुक करताना म्हणाले, पवार साहेबांना ईडीची नोटीस आल्यावर मला काय बोलवता मीच येतो तुमच्याकडे असे ईडीला सांगितल्यावर ईडीच्या कार्यालयाकडे येऊ नका असे पोलिसांना घरी येऊन सांगायला लागले. ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम अशी आहे. आपण तुकारामांच्या बाजूचे आहोत, असेही जयंत पाटील म्हणाले. (Rashtrawadi  Melava)

जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आता शिवभोजन थाळी बंद झाली आहे. अनाथांचे पैसे वळवण्याचे काम सरकारकडून होत आहे. सर्किट हाऊसमध्ये एका पीएकडे दोन कोटी रुपये सापडले. महानगरपालिका तीन वर्षे प्रशासकाकडून चालवल्या जात आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ओबीसींचे सरंक्षण करण्याचे काम पवार साहेबांनी केले आहे. आजही त्यांची हीच भूमिका आहे. पण पवार साहेबांना शिव्या घालायच्या, मग मूळ प्रश्न बाजूला राहतो. त्यातूनच पवारांच्यावर विनाकारण टीका सुरू आहे, असेही ते म्हणाले. (Rashtrawadi  Melava)

हेही वाचा :
राष्ट्रवादी काँग्रेसः २६ वर्षांची वाटचाल दहा मुद्यांद्वारे जाणून घेऊया
चंद्रकांतदादा पाटीलः वाटचालीतील दहा प्रमुख टप्पे

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00