Home » Blog » रायगडावरुन मराठी सन्मान यात्रेस प्रारंभ

रायगडावरुन मराठी सन्मान यात्रेस प्रारंभ

by प्रतिनिधी
0 comments
Marathi Sanman Yatra commenced from Raigad

बेळगाव : प्रतिनिधी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी अस्मिता व सीमाप्रश्नी जागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी सन्मान यात्रेचा प्रारंभ किल्ले रायगडावरून करण्यात आला.

किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला भेट देऊन तिथे अभिवादन करण्यात आले.बेळगाव आणि परिसरातून गेलेल्या अडीचशेहून अधिक   कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.  होळीचा  माळ येथील शिवरायांच्या मूर्तीला अध्यक्ष शुभम शेळके,कार्याध्यक्ष धनंजय पाटील,सरचिटणीस मनोहर हुंदरे,खानापूर समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांच्या हस्ते पुष्पहार  अर्पण करण्यात आले. (Marathi Sanman Yatra commenced from Raigad)

शिवरायांना अभिवादन झाल्यानंतर याच ठिकाणी छोट्याशा सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन  परिसर दणाणून सोडला. होळीचे माळ येथून येळ्ळूर भजनी मंडळाच्या अभंगांच्या गजरात शिवकालीन बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सीमालढयातील पहिल्या पिढीपासून ते चौथ्या पिढीचे बालकही सामील होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन तेथील पवित्र मातीचे संकलन करून सीमाप्रश्नी एकजुटीची शपथ घेण्यात आली. (Marathi Sanman Yatra commenced from Raigad)

 सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवून घेण्यासाठी महाराष्ट्रासह केंद्रसरकारवर दबाव आणण्यासाठी उठाव करावा व उदासीन महाराष्ट्र सरकारला जाग करण्यासाठी मराठी सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील काळात अनेक गावात मराठी सन्मान यात्रा काढून जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. (Marathi Sanman Yatra commenced from Raigad)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00