Home » Blog » Rajesh Narwal : दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर

Rajesh Narwal : दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर

लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या वडिलांनी मानले लष्कराचे आभार

0 comments
Rajesh Narwal

नवी दिल्ली : दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले, अशा शब्दांत लेफ्नंट विनय नरवाल यांच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कारवाईबद्दल त्यांनी भारतीय सशस्त्र दलांचे तसेच पंतप्रधानांचेही आभार मानले. (Rajesh Narwal)

२२ एप्रिल रोजी पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवाल यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या होत्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. विनय नरवाल यांच्यासह २६ जणांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर बुधवारी पहाटे भारतीय लष्कराने धडक कारवाई करत पाकिस्तान आणि व्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईचे देशभरात स्वागत होत आहे. भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे. (Rajesh Narwal)

लेफ्नंट नरवाल यांच्या वडील राजेश नरवाल यांनीही लष्कराचे आभार मानले. ‘‘ही योग्य कारवाई आहे. दहशतवाद्यांना आणि गुन्हेगारांना दिलेले हे योग्य उत्तर आहे. निर्णायक आणि लक्ष्यित प्रतिसादाबद्दल मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या सशस्त्र दलांचे आभार मानतो,’’ असे त्यांनी म्हटले आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त दिले आहे. (Rajesh Narwal)

२२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी केवळ एक आठवडा विनय आणि हिमांशी यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर ते सुटी एन्जॉय करण्यासाठी पहेलगाममध्ये गेले होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात विनय यांना अगदी जवळून गोळ्या घालून ठार मारले होते.

हेही वाचा :
पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त
भारतीय लष्कराचे ‘ऑपरेशन सिंदूर’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00