Home » Blog » मंत्रीपदाच्या बोलीवर बच्चू कडूच्या हाती धनुष्यबाण!

मंत्रीपदाच्या बोलीवर बच्चू कडूच्या हाती धनुष्यबाण!

by प्रतिनिधी
0 comments
Bachchu Kadu joins the Shiv Sena

जमीर काझी : मुंबई : दिव्यांग व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या प्रहार संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी अखेर अपेक्षेप्रमाणे  शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीबरोबरच येत्या काही महिन्यात मंत्री पद देण्याच्या अटीवर त्यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.  

पक्षाने त्यांच्याबरोबर  विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली.अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीला अवघे दोन तास शिल्लक असताना शिंदे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. (Bachchu Kadu joins the Shiv Sena)

कडू यांनी दिव्यांग व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सेनेत प्रवेश केला असून प्रहार संघटनेचे सामाजिक अस्तित्व कायम राहील, असे स्पष्ट केले.

सेनेत पक्षाला विलीन करण्याची ऑफर कडुनी बुधवारी रात्री उशिरा झालेल्या शिंदेबरोबरच्या चर्चेनंतर स्वीकारली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी ठाण्यात आनंदभवन येथे जाऊन पक्ष प्रवेश केला. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना प्रहार संघटना पुढेही स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहिल तर राजकीय लढा शिवसेनेच्या माध्यमातून उभारला जाईल, असे  जाहीर केले. शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, दलित, शोषित आणि गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना शिंदेंनी बच्चू कडूंच्या लढाऊ स्वभावाचे कौतुक करत अन्यायाविरुद्ध लढा हा बाळासाहेबांच्या विचारांचा गाभा असल्याचे सांगितले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव संजय मोरे, आमदार मुरजी पटेल आणि शिवसेना आणि प्रहार संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच दिव्यांग बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Bachchu Kadu joins the Shiv Sena)

राणा दाम्पत्याबरोबरील संघर्षाला बळ….बचु कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे  त्यांचा स्थानिक राजकारणातील प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाच्या नवनीत राणा व आ. रवी राणा यांच्याबरोबरच्या संघर्षामध्ये सत्तेची ताकद मिळणार आहे.  महायुतीत एकत्र राहून  त्यांच्यातील वाद कोणत्या वळणावर जाईल, याबद्दल राजकारणात उत्सुकता लागून राहिली आहे (Bachchu Kadu joins the Shiv Sena)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00