नवी दिल्ली : भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती भारतीय सशस्त्र दलातील दोन वरिष्ठ महिला अधिकारी विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. बुधवारी (७ मे) सकाळी झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हेही उपस्थित होते. (Vyomika Singh)
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये किमान नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला.
व्योमिका सिंग यांनी भारताच्या सीमापार कारवाईची आणि मोहिमेदरम्यान साध्य केलेल्या उद्दिष्टांची अधिकृत माहिती सादर केली.
शालेय वयातच व्योमिका सिंग यांना विमानोड्डाणाची आवड होती. तेथून त्यांचा भारतीय हवाई दलाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. (Vyomika Singh)
विंग कमांडर व्योमिका सिंग राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) मध्ये सामील झाल्या. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकी पूर्ण केली. सशस्त्र दलात सामील होणाऱ्या त्या त्यांच्या कुटुंबातील पहिल्या व्यक्ती होत्या.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, व्योमिका सिंग यांना भारतीय हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले आणि १८ डिसेंबर २०१९ रोजी त्यांना हवाई दलात कायमस्वरूपी कमिशन मिळाले. (Vyomika Singh)
त्यांनी २५०० हून अधिक उड्डाण तास पूर्ण केले आहेत आणि जम्मू-काश्मीर आणि ईशान्येसह काही कठीण प्रदेशात चेतक आणि चित्ता सारखे हेलिकॉप्टर चालवले आहेत. त्यांनी नेतृत्व केलेल्या प्रमुख बचाव मोहिमांपैकी नोव्हेंबर २०२० मध्ये अरुणाचल प्रदेशात केलेली एक मोहीम होती.
हेही वाचा :
कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी?
पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त