Home » Blog »  प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राहुल-प्रियंकाचा रोड शो

 प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राहुल-प्रियंकाचा रोड शो

 प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राहुल-प्रियंकाचा रोड शो

by प्रतिनिधी
0 comments
Rahul Gandhi Wayanad

वायनाड : वृत्तसंस्था : काँग्रेस नेते राहुल गांधी आज केरळ दौऱ्यावर आहेत. वायनाडमध्ये त्यांनी प्रियंका गांधी यांच्यासोबत रोड शो केला. दोघेही सुलतान बथेरी येथील रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका वायनाडमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी रिंगणात आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. प्रियंका यांनी वायनाडच्या सुलतान बथेरीमध्ये रोड शो केला. या वेळी राहुल म्हणाले, की जेव्हा मी पहिल्यांदा ‘भारत जोडो’ यात्रेला गेलो होतो, तेव्हा मला थोडे आश्चर्य वाटले कारण ती राजकीय यात्रा होती. प्रवासाचा उद्देश राजकीय होता; पण प्रवासाच्या अगदी सुरुवातीलाच माझ्या लक्षात आले, की मी लोकांना मिठी मारत होतो आणि लोक मला किस करत होते. मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणत होतो आणि तो म्हणत होता की आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. आज जेव्हा मी विमानात होतो, तेव्हा मला जाणवले, की मी राजकारणात ‘प्रेम’ हा शब्द अनेक वर्षे वापरला नव्हता. वायनाडला आल्यानंतर मी राजकारणात अचानक ‘प्रेम’ हा शब्द वापरायला सुरुवात केली. मला जाणवले, की वायनाडच्या लोकांनी मला इतके प्रेम आणि आपुलकी दिली, की माझे संपूर्ण राजकारणच बदलून गेले. वायनाडच्या लोकांनी मला शिकवले, की या शब्दाला राजकारणात खूप महत्त्वाचे स्थान आहे.

प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी याआधीही रोड शोमध्ये भाग घेतला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. अशा परिस्थितीत त्यांनी वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिला. आता या जागेवरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवत आहेत. प्रियंका यांच्या विरोधात भाकपकडून सत्यन मोकेरी आणि भाजपकडून नव्या हरिदास यांनी निवडणूक लढवली आहे. काँग्रेस पक्षाची ही जागा अत्यंत सुरक्षित मानली जाते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00