नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (२७ मे) मोदी सरकारवर टीका केली. ‘योग्य उमेदवार सापडला नाही,’ या सबबीखाली उच्च संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय जातींविरुद्ध सत्ताधारी सरकार पद्धतशीर भेदभाव करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. (Rahul lashes out at Modi govt)
यासंबंधीची पोस्ट त्यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर केली आहे.
एससी/एसटी/ओबीसी पात्र उमेदवारांना जाणूनबुजून ‘अपात्र’ मानले जात आहे जेणेकरून ते शिक्षण आणि नेतृत्वापासून दूर राहतील,’’ असे श्री. गांधी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्यांनी पुढे असे निदर्शनास आणून दिले की दिल्ली विद्यापीठातील ६० टक्क्यांहून अधिक प्राध्यापक आणि ३० टक्क्यांहून अधिक सहयोगी प्राध्यापकांच्या राखीव पदे रिक्त ठेवण्यात आली आहे. ‘योग्य उमेदवार मिळाले नाहीत,’ ही सबब सांगत या जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. (Rahul lashes out at Modi govt)
“ केवळ याच संस्थांमध्ये नाही तर आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था), केंद्रीय विद्यापीठे आणि सर्वच संस्थांमध्ये असेच षड्यंत्र रचले जात आहे. ‘योग्य उमेदवार मिळाले नाहीत,’ ही सबब सांगून हक्क नाकारणे हा संविधानावर हल्ला आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
हा “सामाजिक न्यायाचा विश्वासघात” असल्याचे प्रतिपादन करून ते म्हणाले, “हा केवळ शिक्षण आणि नोकऱ्यांसाठीचा लढा नाही तर हक्क, आदर आणि सहभागासाठीचा लढा आहे.” (Rahul lashes out at Modi govt)
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांशी बोलताना त्यांनी खुलासा केला की, “आता आपण संविधानाची ताकद घेऊन भाजप/आरएसएसच्या आरक्षणविरोधी प्रत्येक भूमिकेला एकत्रितपणे उत्तर देऊ.” “बाबासाहेब म्हणाले होते, “शिक्षण हे समतेसाठीचे सर्वांत मोठे शस्त्र आहे. परंतु मोदी सरकार ते शस्त्र निस्तेज करण्यात व्यस्त आहे,” असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा :
माझी राख गंगा आणि शेतात विखरुन टाका…
बाळासाहेबांनी शिवसेना फोडणाऱ्यांना मिठी मारली असती का?