Home » Blog » Babbar terrorist killed: बब्बर खालसाचा दहशतवादी स्फोटात ठार

Babbar terrorist killed: बब्बर खालसाचा दहशतवादी स्फोटात ठार

by प्रतिनिधी
0 comments
Babbar terrorist killed

अमृतसर : पंजाबमधील अमृतसर शहरात स्फोटकांचा साठा परत मिळवण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या स्फोटात एक दहशतवादी ठार झाला, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. तो बब्बर खालसाचा दहशतवादी असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Babbar terrorist killed)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतसर ग्रामीण जिल्ह्यातील कांबो पोलिस स्टेशन हद्दीतील नौशेरा गावाच्या परिसरात हा स्फोट झाला.

‘‘सकाळी येथे स्फोट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,’’ असे अमृतसर ग्रामीणचे एसएसपी मनिंदर सिंग म्हणाले. (Babbar terrorist killed)

ते म्हणाले की या घटनास्थळी स्फोटकांची हाताळणी चुकीच्या पद्धतीने केल्याने हा दहशतवादी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, नंतर मृत्यू झाला.

“आम्हाला संशय आहे की तो स्फोटकांची हाताळणी करण्यासाठी आलेल्या आरोपींपैकी एक आहे आणि स्फोटकांची हाताळणी चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे तो जखमी झाला. आमचे एफएसएल पथक अधिक शोध घेण्यासाठी मार्गस्थ करण्यात आले आहे,” असे त्यांनी सांगितले. (Babbar terrorist killed)

पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) (सीमा रेंज) सतींदर सिंग म्हणाले की, मृत हा खलिस्तानी दहशतवादी संघटनेतील बब्बर खालसाचा संशयित सदस्य होता. “जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तो एका दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे आणि तो स्फोटकांची हाताळणी करण्यासाठी आला होता. आम्हाला त्याच्याशी संबंधित बरेच संकेत मिळाले आहेत. बब्बर खालसा आणि आयएसआय पंजाबमध्ये सक्रिय आहेत आणि बहुधा तो बब्बर खालसाचा सदस्य आहे. या अनुषंगाने तपास सुरू आहे,” असे सिंह म्हणाले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00