Home » Blog » Raut criticized Modi-Shaha : बाळासाहेबांनी शिवसेना फोडणाऱ्यांना मिठी मारली असती का?

Raut criticized Modi-Shaha : बाळासाहेबांनी शिवसेना फोडणाऱ्यांना मिठी मारली असती का?

by प्रतिनिधी
0 comments
Raut criticized Modi-Shaha

मुंबई : प्रतिनिधी : हिंदूहृदयसम्राटांची शिवसेना फोडणाऱ्यांना बाळासाहेबांनी मिठी मारली असती का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान आहे. महाराष्ट्र असा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Raut criticized Modi-Shaha)

नांदेड येथील जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘बाळासाहेब असते तर नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा खासदार राऊत यांनी आज मंगळवारी पत्रकारांशी बोलताना चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आज असते तर ते काय म्हणाले असते हे सांगायची गरज नाही. शहा यांना गंभीर गुन्ह्यातून का वाचवले? असा त्यांना पश्चाताप झाला असता असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे भाजपला शरण गेले नाही याचा त्यांना राग आहे. हिंदूहृदयसम्राटांची शिवसेना त्यांनी स्वार्थासाठी फोडली. त्यासाठी बाळासाहेबांनी मिठी मारली असती का? असा सवालही त्यांनी केला. (Raut criticized Modi-Shaha)

अमित शहा हे देशावर लादलेले गृहमंत्री आहेत, अशी टीका खासदार राऊत यांनी केली. पुलावामामध्ये गेलेले ४० जवान शहीद झाले. पहलगाममध्ये २६ माताभगिनींचे कुंकु पुसले आहेत. त्याला केंद्रीय गृहमंत्री शहा जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला. पहेलगाम मध्ये हल्ला करणारे दहशतवादी गुजरातमध्ये पळून गेले का? असा सवाल राऊत यांनी विचारला. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा करण्याची भाजपची हिंमत नाही असा आरोपही त्यांनी केला. विरोधी पक्षांनी या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष संसदेचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. पण ते टाळण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशात पाठवले आहेत असा आरोप केला. पहेलगाम हल्ला आणि आपॅरेशन सिंदूरची माहिती देशातील जनतेला मिळण्याची गरज आहे. मात्र पंतप्रधान मोदी आणि शहा हे प्रश्नांना सामोरे जाण्यास घाबरत आहे असा आरोप केला आहे. (Raut criticized Modi-Shaha)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00