Home » Blog » एमपीएससीच्या एक्साईज परीक्षेतही गैरव्यवहार; राष्ट्रवादीचा आरोप

एमपीएससीच्या एक्साईज परीक्षेतही गैरव्यवहार; राष्ट्रवादीचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Irregularities in the MPSC Excise examination

जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोळ होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेत देखील गुणांकन पॅटर्न फुटीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी गुरुवारी  त्याची पोलखोल केली. (Irregularities in the MPSC Excise examination)

परिक्षेचा पॅटर्न लिक

पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील गुणांकन पॅटर्न लीक झाले आहे. एमपीएससी गुणांकन पॅटर्न फुटल्याचे मान्य केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अहवाल शासनाकडे पाठविल्याचे वृत्त आहे. पेपरच्या पारदर्शकतेवर रोज प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेत जवळपास ९०० विद्यार्थी होते. या परीक्षेचा पॅटर्न व्हॉट्सअॅपवर लीक झाला. याबाबत आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र पॅटर्न लीक करणाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे सांगून मेहबूब शेख म्हणाले की, एका विद्यार्थिनीला पहिल्या पेपरमध्ये ८१, तर दुसऱ्या पेपरमध्ये ४५ गुण, इतर उमेदवारांच्या गुणांच्या तुलनेत हा निकाल हे संशयास्पद आहे, मात्र, या गुणांमागील कारणांबाबत अधिकृत चौकशी किंवा निष्कर्ष समोर आलेला नाही. आयोगाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार होत आहेत ,व्हॉट्सअॅप ग्रुपमधील संभाषणांत आहे,अमित सरांमुळे मी पीएसआय झालो’, असे एक विद्यार्थी जाहीरपणे सांगत आहे. मैदानी चाचणीच्या वेळी काही विद्यार्थ्यांना तीन वेळा संधी देण्यात आली. सेटिंग लावून गेलेले विद्यार्थी आज नोकरी करत आहेत,असे असल्याचा आरोप त्यांनी केला. (Irregularities in the MPSC Excise examination)

किती काळ दोन समाजांना आमनेसामने आणणार?

मनोज जरांगे यांच्या उपोषणावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले की, यापूर्वी नऊ-दहा वेळा सरकारने उपोषण सोडवले आहे. आता पुन्हा उपोषण करण्याची वेळ येणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी. उपोषण सोडताना सरकार एक सांगते आणि नंतर वेगळी भूमिका घेते. किती काळ दोन समाजांना आमनेसामने आणणार? असा प्रश्न मेहबूब शेख यांनी विचारला आहे. (Irregularities in the MPSC Excise examination)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!