Home » Blog » युपीआय टॅक्स तात्काळ  मागे घ्या; राहूल गांधींची मोदींकडे मागणी

युपीआय टॅक्स तात्काळ  मागे घ्या; राहूल गांधींची मोदींकडे मागणी

by प्रतिनिधी
0 comments
Rahul Gandhi demands withdrawal of tax on UPI

नवी दिल्ली : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी युपीआय टॅक्स तात्काळ मागे घ्या अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. अमेरिकेसमोर लोटांगण घालणे थांबवा, स्वाभिमानाने सामोरे जा अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली आहे. (Rahul Gandhi demands withdrawal of tax on UPI)

रोख रक्कमेचा व्यवहार थांबवून डिजिटल देयक प्रणाली युपीआय देशात लोकप्रिय झाली आहे. देशातील लाखो लोक युपीआयच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत. पण हेच व्यवहार आता केंद्र सरकारच्या डोळ्यात खुपत असल्याने युपीआय व्यवहारावर आता शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे रोखीने व्यवहार वाढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.

नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने युपीआय व्यवहारावरील शुल्क जाहीर केले आहेत. व्यापाऱ्यांशी केलेल्या जाणाऱ्या २००० पेक्षा अधिक रक्कमेच्या युपीआय व्यवहारावर ०.४ टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच ७५ हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कमेच्या व्यवहारावर ३०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबरपासून देशभरात शुल्क लागू करण्यात येणार आहे. (Rahul Gandhi demands withdrawal of tax on UPI)

केंद्र सरकारच्या निर्णयावर राहूल गांधींनी जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. एक्स वर केलेल्या पोस्ट मध्ये मोदीजी युपीआय कर आताच्या आता मागे घ्या अशी मागणी केली आहे. पंतप्रधान मोदींनी युपीआयवर कर लादून प्रत्येक भारतीयांवर बोजा टाकला आहे. या माध्यमातून अमेरिकन कंपन्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. मोदींनी अमेरिकेसमोर झुकणे थांबवावे. ठाम भूमिका घेऊन युपीआय कर तात्काळ रद्द करावा अशी अशी मागणी केली आहे. अमेरिकेसमोर नतमस्तक होण आधी बंद करा. स्वाभिमानाने सरळ उभे राहा. आणि युपीआयवर लादलेला कर त्वरीत मागे घ्या अशी मागणी केली आहे. (Rahul Gandhi demands withdrawal of tax on UPI)

You may also like

error: Content is protected !!