Home » Blog » कोल्हापूर, सातारा संघास सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर, सातारा संघास सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा

by प्रतिनिधी
0 comments
Police competition

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर विभाग आणि सातारा विभागाला समान गुण मिळाल्याने दोन्ही संघांना सर्वसाधारण विजेतेपदाची ढाल विभागून देण्यात आली. बेस्ट अथलिटचा बहुमान कोल्हापूरच्या अमृत तिवले याला पुरुष गटात तर महिला गटात कोल्हापूरच्याच सोनाली देसाईला मिळाला. महिला गटात सर्वसाधारण विजेतेपद कोल्हापूर विभागाला मिळाले. गेले चार दिवस स्पर्धा खेळवण्यात आली. स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण विभागातील पोलिस खेळाडू सहभागी झाले होते. (Police competition)

आज बुधवारी सायंकाळी स्पर्धेचा समारोप झाला. तत्पुर्वी झालेल्या ४ X१०० मीटर रिले शर्यतीत पुरुष गटात कोल्हापूरने सुवर्णपदक पटकावले. साताऱ्याने रौप्य तर सांगलीने ब्राँझ पदक मिळविले. महिला गटातही कोल्हापूरने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले. सातारा संघास रौप्य तर पुणे ग्रामीणला ब्राँझ पदक मिळाले.

कोल्हापूर विभागाने तायक्वांदो पुरुष, वुशू पुरुष आणि महिला गट, व्हॉलीबॉल महिला, फुटबॉल, हॉकी, क्रॉसकंट्री पुरुष महिला क्रीडा प्रकारात सर्वसाधारण जेतेपद मिळवले, सातारा विभागाने वेटलिफ्टिंग पुरुष आणि महिला गटात, ज्युदोमध्ये पुरुष आणि महिला गटात, कुस्तीमध्ये पुरुष आणि महिला, जलतरण प्रकारात  गटात सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. महिला बाँक्सिंग, खो खो पुरुष गट, व्हॉलीबॉल पुरुष, हॅन्डबॉलमध्ये सांगली जिल्ह्याने सर्वसाधारण जेतेपद मिळविले. सोलापूर ग्रामीण संघाने कबड्डी पुरुष, सोलापूर शहर संघाने बास्केटबॉल महिला आणि पुरुष गटात सर्वसाधारण जेतेपद मिळवले. (Police competition)

प्रमुख पाहुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पलकुंडवार आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महिनिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते बक्षिस वितरण झाले. यावेळी सोलापूर पोलिस आयुक्त एस. राजकुमार, कोल्हापूर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांची उपस्थिती होती.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00