कोल्हापूर : प्रतिनिधी : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वादग्रस्त ठरलेले सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली सांगली पोलिस अधीक्षकपदी झाली आहे. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक योगेश गुप्ता यांना बढती मिळाली असून ते गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांची बदली कोल्हापूर पोलिस अधीक्षकपदी झाली आहे. (SP Tushar Doshi transferred to Sangli)
पुणे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांची सातारा पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे. सांगली पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभाग पोलिस उपायुक्तपदी झाली आहे. गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एन. रमेश यांना गडचिरोली पोलिस अधीक्षकपदी बढती मिळाली आहे. जळगावचे पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगाव पोलिस अधीक्षकपदी, पुणे पोलिस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिम पोलिस अधीक्षकपदी तर जळगावचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे अधीक्षकपदी बदली झाली आहे. (SP Tushar Doshi transferred to Sangli)
तुषार दोशींना मिळाला शेजारचा जिल्हा… सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंत्री शंभुराजे देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. त्याचे पडसाद विधानभवनात उमटले होते. शंभूराजे देसाई यांनी पोलिस अधीक्षक तुषार दोशींना बडतर्फ करण्याची मागणी केली होती. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी पोलिस अधीक्षक दोशींना निलंबित करण्याचा आदेश दिले होता. गोऱ्हे यांचा आदेश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी फिरवला होता. त्यामुळे दोशींना जीवदान मिळाले होते. पण मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाला न दुखावता मुख्यमंत्र्यांनी तुषार दोशी यांची बदली सांगलीला केल्याची चर्चा आहे. (SP Tushar Doshi transferred to Sangli)