नवी दिल्ली : सम्राट बहादूर शाह जफर यांचे वंशज असल्याचा दावा करत एका महिलेने लाल किल्ल्याचा ताबा देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर तुम्ही वंशज असाल तर ‘‘फक्त लाल किल्लाच का? फतेहपूर सिक्री का नाही? त्यावरही का दावा केला नाही, असे विचारत ही याचिका पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे ती फेटाळण्यात येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. (Plea on Red Fort dismissed)
सुलताना बेगम यांनी आपण बहादूर शाह जफर यांचे वंशज असल्याचा दावा केला होता. तसेच लाल किल्ल्याचा ताबा देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. ती सोमवारी (५ मे) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार यांच्या खंडपीठाने ही याचिका याचिका पूर्णपणे चुकीची असल्याचे नमूद करून ती फेटाळून लावली. (Plea on Red Fort dismissed)
सुनावणीदरम्यान कोर्टाने बेगमना म्हटले की, जर त्या खरोखरच शेवटच्या मुघल सम्राटाशी संबंधित असतील तर त्या इतर स्मारकांचा आणि संपूर्ण प्राचीन शहर फतेहपूर सिक्रीवरही असल्याचा दावा करू शकतात. याचिका पूर्णपणे चुकीची आहे आणि ती फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
याआधी सुलताना बेगम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
२०२१ मध्ये बेगम यांनी पहिल्यांदा दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर लाल किल्ल्याची मालकी मिळवण्यासाठी याचिका दाखल केली. त्यावेळी त्यांनी दावा केला होता की त्या मिर्झा मोहम्मद बेदर बख्त यांची विधवा आहेत. बख्त हे बहादूर शाह जफर यांचे पणतू आणि कायदेशीर वारस होते. त्यांनी केंद्र सरकारकडून ऐतिहासिक स्मारकावरील कथित बेकायदेशीर कब्ज्याबद्दल भरपाईची मागणी केली होती. (Plea on Red Fort dismissed) तथापि, एकल न्यायाधीशांनी त्यांची याचिका ‘एक शतकाहून अधिक काळानंतर’ दाखल करण्यात आली होती, असे स्पष्ट करत ती फेटाळून लावली. न्यायालयाने असेही म्हटले की ही याचिका वेळेचा अपव्यय आहे.
हेही वाचा :
राहुल गांधींविरोधात याचिका फेटाळली