Home » Blog » SIT on Vijay Shah: माजी मंत्री विजय शाह यांची माफी फेटाळली

SIT on Vijay Shah: माजी मंत्री विजय शाह यांची माफी फेटाळली

एसआयटी स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

by प्रतिनिधी
0 comments
SIT on Vijay Shah

नवी दिल्ली : लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी मागितलेली माफी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. हे विधान लज्जास्पद असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली. (SIT on Vijay Shah)

‘‘मंत्र्यांच्या विधानामुळे संपूर्ण देशाला लाज वाटत आहे,’’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. विजय शाह यांना खऱ्या अर्थाने माफी मागून किंवा योग्य पश्चात्ताप व्यक्त करून स्वतःची सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने म्हटले आहे की, त्यांनी असे भाष्य करण्यापूर्वी संवेदनशील असले पाहिजे. (SIT on Vijay Shah)

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने मध्य प्रदेश सरकारला मंगळवारपर्यंत एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले. या पथकात राज्याबाहेरील तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असावा. यात किमान एक महिला अधिकारी असावी. एसआयटीला २८ मे पर्यंत स्थिती अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

“आपण कायद्याचे पालन करणारा देश आहोत आणि कायदा सर्वोच्च ते कनिष्ठांपर्यंत समान आहे,” असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

विजय शाह यांच्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत होते. त्यांनी माफी मागितली आहे का असे विचारले असता, त्यांच्या वकिलांनी सांगितले की माफी आधीच मागितली गेली आहे. तथापि, न्यायालयाने त्याची सत्यता आणि हेतू यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पीठाने विजय शाह यांच्या अटकेला स्थगिती दिली; परंतु या प्रकरणाला राजकीय स्वरूप येऊ दिले जाणार नाही असा इशारा दिला. “त्याला परिणामांना सामोरे जावे लागेल. कायद्याला त्याचे काम करू द्या. आम्ही याचे राजकारण करू देणार नाही,” असे न्यायमूर्ती कांत यांनी राज्य सरकारला सुनावले.

आगामी एसआयटी चौकशीला मध्य प्रदेश सरकारसाठी “लिटमस टेस्ट” म्हणून वर्णन करताना न्यायालयाने स्पष्ट केले की ते या प्रकरणाचे बारकाईने निरीक्षण करेल. (SIT on Vijay Shah)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध भारताच्या आक्रमकतेचा उल्लेख करत विजय शाह यांनी एका जाहीर सभेत, ‘‘त्यांच्या स्वतःच्या बहिणीला (कर्नल सोफिया कुरेशी) सूड घेण्यासाठी पाठवले,’’ असे वक्तव्य केले होते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00