Home » Blog » Oppositions criticizes Shah’s bill: देश गंभीर आणीबाणीच्या स्थितीत : महुआ, प्रियंकांची टीका

Oppositions criticizes Shah’s bill: देश गंभीर आणीबाणीच्या स्थितीत : महुआ, प्रियंकांची टीका

by प्रतिनिधी
0 comments
Oppositions criticizes Shah’s bill

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात पुन्हा एकदा देश गंभीर आणीबाणीच्या स्थितीत आहे, अशा तीव्र शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केली आहे. (Oppositions criticizes Shah’s bill)

गृहमंत्री अमित शहा यांनी गंभीर गुन्हेगारी आरोपांवरून अटक करण्यात आलेल्या पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना काढून टाकण्यासाठी सरकार विधेयक आणले आहे. त्यावर या दोन्ही नेत्यांनी शहा यांच्यावर जोरदार टीका केली.

महुआ मोइत्रा म्हणाल्या, ‘‘आज भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वांत काळा दिवस आहे. काल रात्री उशिरा, भाजपने एक विधेयक मांडले जे एक घटनादुरुस्ती विधेयक आहे आणि या विधेयकामुळे गंभीर गुन्ह्यात असलेल्या कोणत्याही विरोधी मंत्र्याला ३० दिवसांच्या आत अटक करता येते… हे अत्यंत धोकादायक आहे, आपण अति आणीबाणीच्या स्थितीत आहोत.’’ (Oppositions criticizes Shah’s bill)

विधेयकातील प्रस्तावित तरतुदींनुसार, एखादा मंत्री गंभीर गुन्ह्याच्या (पाच वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेचे गुन्हे) प्रकरणात सलग ३० दिवस तुरुंगात असेल तर राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार त्याला पदावरून हटवू शकतील.

क्रूर विधेयक : प्रियंका गांधी

संसद परिसरात माध्यमांशी बोलताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी या विधेयकांना क्रूर म्हटले आहे. कारण ही विधेयके प्रत्येक गोष्टीच्या, लोकशाहीच्या विरोधात आहेत. सरकारमधील लोक या विधेयकांना भ्रष्टाचारविरोधातील उपाय म्हणत असले तरी ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे. (Oppositions criticizes Shah’s bill) त्या म्हणाल्या, “उद्या तुम्ही एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणताही खटला दाखल करू शकता. दोष सिद्ध न होता वेगवेगळ्या मार्गांनी तुम्ही त्या मुख्यमंत्र्यांना ३० दिवसांसाठी तुरुंगात डांबून ठेवाल आणि मग ती व्यक्ती मुख्यमंत्रिपदी राहू शकणार नाही. हा सगळा संविधानविरोधी प्रकार आहे. याद्वारे लोकशाहीची हत्या केली जाईल.”

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00