Home » Blog » ईश्वरपूर, आष्टा नगरपरिषदेत जयंत पाटलांकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम

ईश्वरपूर, आष्टा नगरपरिषदेत जयंत पाटलांकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम

by प्रतिनिधी
0 comments
Jayant Patil wins in the Ishwarpur and Ashta Municipal Councils

सांगली : ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी वर्चस्व मिळवले. घरच्या मैदानावर नगराध्यक्षपदासह २३ जागा जिंकून सत्तांतर घडवले. नगराध्यक्षपदी  आनंदराव मलगुंडे विजयी झाले. विरोधी गटातील भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट, काँग्रेस विकास आघाडीला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात भक्कम आघाडीचा प्रयत्न केला होता. त्यांच्या प्रयत्नांना जयंत पाटील यांनी सुरुंग लावला. भाजपच्या पदरात तीन जागा पडल्या. अजित पवार राष्ट्रवादी गटाला तीन तर शिवसेना शिंदे गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले. (Jayant Patil wins in the Ishwarpur and Ashta Municipal Councils)

आष्टा नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार विलासराव शिंदे, जयंत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील आष्टा शहर विकास आघाडीने २४ पैकी २३ जागा जिंकल्या. विरोधी महायुतीला एका जागेवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्षपदाचे उमेदवार विशाल शिंदे यांनी प्रविण माने यांचा दणदणीत पराभव केला. (Jayant Patil wins in the Ishwarpur and Ashta Municipal Councils)

पलूस नगरपरिषदेत काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांचे वर्चस्व राहिले. काँग्रेसने नगराध्यक्षपदासह १६ जागांवर विजय मिळवला. नगराध्यक्षपदी संजिवनी पुदाले विजयी झाल्या. अजित पवार गटाला चार तर भाजपला एक जागा मिळाली.

नव्याने निर्माण झालेल्या आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे यु.टी.जाधव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले पण सर्वाधीक ८  जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या. अजित पवार गट आणि तीर्थक्षेत्र  विकास आघाडीला एक जागा मिळाली. (Jayant Patil wins in the Ishwarpur and Ashta Municipal Councils)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00