Home » Blog » Remove stray dogs immediately : भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवा ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Remove stray dogs immediately : भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवा ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

by प्रतिनिधी
0 comments
Remove stray dogs immediately

नवी दिल्ली : सार्वजनिक ठिकाणावरुन भटक्या कुत्र्यांना ताबडतोब हटवा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांनी हा निकाल दिला. (Remove stray dogs immediately)

शैक्षणिक संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुल, बसस्थानक, रेल्वे स्टेशन या ठिकाणी असलेल्या सर्व कुत्र्यांना ताब्डतोब तिथून हलवून त्यांच्यासाठी विशेष निवारा व्यवस्थेमध्ये ठेवावे असे आदेशही न्यायालयाने दिले आहे. तसेच निवारा केंद्रात हलवण्याच्या आधी कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरणही केले जावे असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. (Remove stray dogs immediately)

दरम्यान ज्या ठिकाणाहून भटक्या कुत्र्यांना पकडून त्याचे निर्बिजीकरण केले आहे, त्यांना पुन्हा त्या भागात सोडू नये असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. आम्ही पूर्ण विचाराअंती हे आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणाहून भटक्या कुत्र्यांना पकडले आहे. तिथे त्यांना पुन्हा सोडण्यात येऊ नये. कारण असे केल्यास सार्वजनिक ठिकाण या कुत्र्यांमुळे होणारा मनस्ताप कमी करण्याच्या मूळ भूमिकेलाच धक्का बसेल असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या संदर्भात निर्बिजीकरणानंतर कुंत्र्यांना पुन्हा सोडून देण्याचा मुद्दा सुनावणीदरम्यान उपस्थित करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले. (Remove stray dogs immediately)

सार्वजनिक ठिकाणाहून भटक्या कुत्र्यांना हलवण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन व्यवस्थेकडे देण्यात आली. पुढील दोन आठवड्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणांची यादी प्रशासनाने तयार करावी. आणि त्यानुसार कार्यवाही करावी असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आठ आठवड्यानंतर १३ जानेवारी २०२६ रोजी केलेल्या कारवाईसंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा जाच होऊ नयेसाठी तारांचे कुंपन, सरंक्षक भिंती, गेट अशी सरंक्षक बांधकामे आवश्यकतेनुसार करावीत, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. (Remove stray dogs immediately)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00