Home » Blog » अंबाबाईची महिषासुर मर्दिनी रुपात पूजा

अंबाबाईची महिषासुर मर्दिनी रुपात पूजा

Navratri Ustav 2024 : अंबाबाईची महिषासुर मर्दिनी रुपात पूजा

by प्रतिनिधी
0 comments
Navratri Ustav 2024

कोल्हापूर;  प्रतिनिधी : करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविक दररोज दर्शनासाठी हजेरी लावत आहेत.मात्र, पावसाच्या शक्यतेने भाविकांची संख्या घटू लागली आहे. भाविकांची संख्या कमी राहिल्याने मुख्य दर्शनरांग व मुख दर्शनाच्या रांगा अपवाद वगळता रिकाम्या राहिल्या.काल दिवसभरात ७४ हजार ९५३ भाविकांची देवीचे दर्शन घेतले. (Navratri Ustav 2024)

आज आश्विन शुद्ध अष्टमी. शारदीय नवरात्र उत्सव नवव्या दिवशी महिषासुर मर्दिनी रुपात पूजा बांधण्यात आली आहे. तंत्रात ‘महारात्री म्हणून ओळखली जाणारी ही तिथी. आजच्याच दिवशी जगदंबा आदिशक्ती विराट रूप धारण करून महिषासुराचा वध करती झाली. त्रिलोकला त्रास देणारा असुर या तिथीला संपला पण त्याही पेक्षा ५१ शक्तिपीठांचा यादीत करवीरसाठी करवीरे महिष मर्दिनी असा येणारा उल्लेख सार्थ करणारी आजची ही महातिथीची पूजा. आज महिषासूर मर्दिनी पूजा श्री पूजक माधव मुनीश्वर,मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00