नवी दिल्ली : प्रतिनिधी : देशात गेल्या चार महिन्यांत ६२ वाघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यांत २० वाघ मृत्यूमुखी पावले असून देशात महाराष्ट्र व्याघ्रमृत्यू आकडेवारीत अग्रस्थानी आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल १७ वाघांचे मृत्यू मध्यप्रदेशात झाले आहेत. एकीकडे पट्टेदार वाघांची संख्या वाढत असताना वाघांच्या वाढत्या मृत्यूमुळे पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. (Tiger death)
देशभरात २०२२ च्या व्याघ्र गणनेनुसार देशात ३१६७ वाघांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातही वाघांची संख्या वाढली असून २०२२ मध्ये ४४४ वाघ आहेत. हीच संख्या २०१८ मध्ये ३१२ इतकी होती. व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्राने आघाडी घेतली असली तरी वाघांच्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ होत चालली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात जानेवारी २०२५ पासून २६ एप्रिलपर्यंत चार महिन्यात ६२ वाघांचा मृत्यू झाले आहेत. वन्यजीवांची झुंज, अपघात, शिकार आणि आणि नैसगिक कारणांने वाघांचा मृत्यू झाला आहे. (Tiger death)
बहिलया आणि बावरिया यासह विविध टोळ्यांकडून मागील पाच वर्षात १०० हून अधिक वाघांच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती अलीकडेच पुढे आली आहे. वाघांच्या शिकारीत वाढ होत चालली असून वाघांचे अवयवांची तस्करी आंतरराष्ट्रीय पातळीवर करणारे आंतरराष्ट्रीय सिंडीकेट कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. (Tiger death)
मागील पाच् वर्षातील मृत्यूंची संख्या
२०२०-११६
२०२१-१२७
२०२२-१७८
२०२४-१२४
हेही वाचा :
जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
प्रत्येक भारतीय संतापाने पेटलेला आहे.