नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (२७ सप्टेंबर) देशवासीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आणि देवीचे आशीर्वाद मागितले. (PM Modi extends Navratri greetings)
“या नवरात्रीत, आज आपण देवी मातेसमोर आदराने नतमस्तक होऊ! तिची कृपा सर्वांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करो. सर्व भक्तांना आईचे आशीर्वाद मिळोत हीच आमची प्रार्थना आहे,” असे पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
नवरात्र, हा नऊ दिवसांचा उत्सव आहे जो स्त्रीत्वाचा सन्मान करतो, हा उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि आध्यात्मिक वाढ, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि सामुदायिक बंधनाचा एक प्रसंग आहे.(PM Modi extends Navratri greetings)
पंतप्रधान मोदींचा संदेश नवरात्रीचे सांस्कृतिक महत्त्व आणि वैयक्तिक वाढ आणि कल्याणासाठी दैवी आशीर्वाद घेण्याचे महत्त्व प्रतिबिंबित करतो. राष्ट्राला दिलेल्या त्यांच्या शुभेच्छांमधून एकता आणि आध्यात्मिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यात या सणाची भूमिका अधोरेखित होते.(PM Modi extends Navratri greetings)
नवरात्रीच्या काळात लोक अनेकदा उपवास करतात, प्रार्थना करतात आणि गरबा आणि दांडिया रास सारख्या विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात. हा सण कुटुंब पुनर्मिलन, दानधर्म आणि विश्वात पसरलेल्या दैवी स्त्री शक्तीचे चिंतन करण्याचा काळ आहे.
Navratri
कोल्हापूर; प्रतिनिधी : करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविक दररोज दर्शनासाठी हजेरी लावत आहेत.मात्र, पावसाच्या शक्यतेने भाविकांची संख्या घटू लागली आहे. भाविकांची संख्या कमी राहिल्याने मुख्य दर्शनरांग व मुख दर्शनाच्या रांगा अपवाद वगळता रिकाम्या राहिल्या.काल दिवसभरात ७४ हजार ९५३ भाविकांची देवीचे दर्शन घेतले. (Navratri Ustav 2024)
आज आश्विन शुद्ध अष्टमी. शारदीय नवरात्र उत्सव नवव्या दिवशी महिषासुर मर्दिनी रुपात पूजा बांधण्यात आली आहे. तंत्रात ‘महारात्री म्हणून ओळखली जाणारी ही तिथी. आजच्याच दिवशी जगदंबा आदिशक्ती विराट रूप धारण करून महिषासुराचा वध करती झाली. त्रिलोकला त्रास देणारा असुर या तिथीला संपला पण त्याही पेक्षा ५१ शक्तिपीठांचा यादीत करवीरसाठी करवीरे महिष मर्दिनी असा येणारा उल्लेख सार्थ करणारी आजची ही महातिथीची पूजा. आज महिषासूर मर्दिनी पूजा श्री पूजक माधव मुनीश्वर,मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : आज शारदीय नवरात्र महोत्सवाची सप्तमी तिथी आठवा दिवस आजच्या तिथीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई वाघावर विराजमान दुर्गेच्या रूपात सजली आहे. वाघावर ती स्वार झालेले दुर्गेचे हे अष्टभुजा रूप उत्तर भारतात विशेष प्रसिद्ध आहे वरद कमळ तलवार चक्र शंख गदा धनुष्य आणि त्रिशूल धारण करणारी अशी ही जगदंबा दुर्गमासुराचा संहार करण्यासाठी प्रगट झाली अशी ख्याती आहे. शाकंभरीच्या अवतारातच जगत पोषणाचे काम झाल्यानंतर उन्मत्त झालेल्या दुर्गमासुराचा वध केल्यामुळे देवीला दुर्गा हे नाव प्राप्त झाले असे मानले जाते. दुर्गा सप्तशती या ग्रंथात देवीने आपल्या भविष्यात्मक अवताराचे वर्णन करताना आपल्या या रूपाचे वर्णन केले आहे अशी दुर्गा चार सहा आठ दहा बारा सोळा अठरा हातांची देखील दाखवली जाते. आज करवीर निवासिनी अष्टभुजा रूपामध्ये सजली आहे.दुर्गा म्हणजे कठीणातल्या कठीण संकटाचेही निवारण करणारी देवता आपल्या सर्वांच्या आयुष्यातील संकटे दूर व्हावीत हीच देवीच्या या अष्टभुजा रूपाकडे प्रार्थना. (Navratri Ustav 2024)
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्नसशक्तिकः
‘दुर्गा’ म्हणजे देवीचे नाव एवढीच माहिती आपल्याला असते. परंतु दुर्गाशब्दाची व्याख्या अत्यंत व्यापक आहे. सर्वश्रेष्ठ निर्गुण परब्रम्हाच्या शक्तीचे माया रुपाचे सर्वप्रथम स्वरूप म्हणजे ‘दुर्गा’ होय. सर्व देवतांचे कार्यकारण अवतार. जिच्या इच्छेने, जिच्या पासून निर्माण झाले, जिच्या प्रभावाने जिच्या ठिकाणी राहिले. जिच्या स्वरूपात लय पावून अथवा जिच्या ठिकाणी राहून सन्मान पावत आहेत. तिच महामाया आदिशक्ती दुर्गा होय.दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाच्या ११ व्या अध्यायात वर्णन केल्या प्रमाणे… मी दुर्गम नावाच्या महा पराक्रमी दैत्याचा वध केल्यामुळे माझे दुर्गा हे नाव प्रसिद्ध पावेल. दुःख, दारिद्रय आणि भय हरण करणारी, दुर्गम पिडेचा नाश करणारी याप्रमाणे श्रीदुर्गा देवी स्तुती केलेली आहे.ह्याच दुर्गेने विविध कारणांनी जे अवतार धारण केले ते नवदुर्गा म्हणून प्रसिद्ध आहेत. ही अष्टभुजा असून वाद्यावर बसलेली आहे.ही पुजा विद्याधर मुनिश्वर, अरुण मुनिश्वर, सोहम मुनिश्वर व सुकृत मुनिश्वर यांनी बांधली.
कोल्हापूर; प्रतिनिधी : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या दिवशी अंबाबाईची महाप्रत्यांगिरा देवी रुपात पूजा बांधण्यात आली. अथर्व वेदामध्ये या देवतेचा उल्लेख आहे. आपण केलेल्या कोणत्याही कार्याची विपरीत फळे मिळत असतील किंवा आपल्यावर केलेले अभिचार (करणी) कर्माचा निरास करण्यासाठी, पिशाच्चबाधा, शत्रूबाधा दूर करण्यासाठी तसेच अपयश, नैराश्य, नष्ट करून कीर्ती, वैभव पुनः प्राप्त करण्यासाठी महाप्रत्यांगिरा देवीची उपासना ही शीघ्र फलदायी आहे. (Navratri Ustav 2024)
आपल्या उपासकावर कोणीही षट्कर्म, करणी केल्यास स्वतः देवी प्रत्यागिरा त्या बाधेचे निवारण करून प्रतीपक्षी दुष्रास नष्ट करते. काळ्या जादूपासून देवी तिच्या भक्ताना सुरक्षा देते. ही कर्म भोगात बदल करणारी सामर्थ्यवान देवता आहे. होला नारसिंही असे पण म्हणतात. ही चतुर्भुज असून मुख सिंहाचे (नासिंहा सारखे) आहे. ही पूजा श्रीपूजक विद्याधर मुनिश्वर, अरुण मुनिश्वर, सचिन गोटखिंडीकर व श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत त्र्यंबोली मंदिर परिसरात आज (दि.८) ललित पंचमीचा (कोहळा पंचमी) सोहळा उत्साहात पार पडला. (Navratri Ustav 2024)
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाई गजारुढ रुपात पूजा बांधण्यात आली. त्यानंतर अंबाबाईचा पालखी सोहळा त्र्यंबोली भेटीसाठी निघाला. मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी होते. माजी खा. संभाजीराजे, मालोजीराजे, यशराजे हे करवीर घराण्यातील सदस्य या सोहळ्यासाठी उपस्थित होता. कोहळा फोडण्याचा मान सागरिका गुरव या कुमारिकेला मिळाला. तिच्या हस्ते त्रिशूळाने कोहळा फोडला. त्यानंतर त्र्यंबोली व अंबाबाईची भेट घडवण्यात आली. पंचोपचार पूजा, आरती, आहेराची देवघेव झाली. त्यानंतर सर्व पालख्या परतीच्या मार्गाला लागल्या. त्र्यंबोली देवीची सिंहासनरुढ रूपात पूजा संतोष गुरव, योगराज गुरव, शार्विल गुरव यांनी बांधली. (Navratri Ustav 2024)
काय आहे अख्यायिका?
शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमी या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पालखी भालदार, चोपदार, सेवेकरी आणि श्रीपूजकांच्या शाही लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर जाते. अंबाबाईने कोल्लासुराचा नाश केल्यानंतर त्याच्या पत्नीने कामाक्ष नावाच्या पुत्राला जन्म दिला. आपल्या पित्याचा आणि दैत्यकुळाचा अंबाबाईने व देवतांनी नाश केला याचा त्याला राग होता. देवतांवर विजय मिळवण्यासाठी त्याने कपिल महामुनींकडून योगदंड मिळवला. हा योगदंड कोणावरुनवही फिरवला असता त्याचे प्राणिरुप होईल आणि जमिनीवर ठेवताच याचे सामर्थ्य नष्ट होई. हा योगदंड घेऊन कामाक्ष मुक्तिमंडपात आला. येथे देवगणांसह अंबाबाई कोल्हासुर वधाचे कुष्मांडभेदन करीत होती. एकाच ठिकाणी असलेल्या देवगणांचे कामाक्षाने शेळ्यामेंढ्यात रुपांतर केले. तेव्हा त्र्यंबोली देवीने वृद्धेचे रुप घेऊन कामाक्षाकडून योगदंड हिसकावून घेतला. त्याचा वध केला. तिचे हे देवलोकावर ऋण होते. मात्र असुरवधानंतर करण्यात आलेल्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीला बोलवायचे राहून गेले. त्यामुळे ती रुसून शहराबाहेरच्या टेकडीवर जाऊन बसली. ते लक्षात आल्यानंतर अंबाबाई स्वत: आपल्या लव्याजम्यानिशी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी गेली. तिच्या इच्छेनुसार टेकडीवर कुष्मांडभेदन (कोहळा) करून दाखवले. ही या पूजेमागील आख्यायिका आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर; प्रतिनिधी : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या दिवशी (ललित पंचमी) करवीर निवासिनी श्री अंबाबाई गजारुढ अंबाबाई रुपात पूजा बांधण्यात आली.श्री त्र्यंबोली पंचमी- कोलासुर पुत्र कामाक्ष अत्यंत उग्र व पराक्रमी पुत्र होता. देवताकडून त्याचा पराभव झाल्यानंतर निराश होऊन तो दैत्यगुरु शुक्राचार्याकडे गेला व त्यांच्या आज्ञेने कपिलाश्रमात कपिलमहामुनींची सेवा करुन, त्यांच्याकडून योगदंड मिळविला. हा योगदंड कोणावरूनही फिरविला असता, तो प्राणिरूप होई. मात्र जमिनीवर ठेवताच याचे सामर्थ्य तत्क्षणी नष्ट होई. (Navratri Ustav 2024)
हा योगदंड घेऊन कामाक्ष मुक्तिमंडपात आला, येथे देवगणांसहित जगदंबा कोल्हासुर वधोत्सवाचे कूष्मांडभेदन करीत होती, एकाच ठिकाणी असलेल्या देवगणांवरुन कामाक्षाने योगदंड फिरविला, यामुळे सर्व देवांचे शेळ्या मेंढ्यात रुपांतर झाले. तेव्हा त्र्यंबोलीने वृद्धस्त्रीचे रूप घेऊन, मायेने कामानाकडून योगदंड हिसकावुन घेऊन, त्याचा वध केला. या योगदंडाच्या शक्तीने सर्वदेवांस पूर्ववत् केले. हे तिचे देवलोकांवर मोठे ऋण होते. (Navratri Ustav 2024)
कोल्लासुरवधासाठी त्र्यंबुलीने देवीस प्रचंड साहाय्य केले असूनही, विजयोत्सवात तिला बोलाविण्याचे राहून गेले, याचा त्र्यंबुलीला राग आला व ती रागाने करवीराबाहेर एका टेकडीवर जाऊन बसली. ही गोष्ट जगदंबेच्या ध्यानात येताच, तिने त्र्यंबुलीस दासीकरवी निरोप धाडला. अखेर त्र्यंबुलीच्या रागाचे परिमार्जन करण्यासाठी जगदंबा स्वतः तिच्या भेटीस गेली आणि कोल्लासुरवधाचा विजयोत्सव (कोहाळा छेदन) त्र्यंबुलीसमोरच साजरा केला, यानंतर,’ अश्विनशुद्ध पंचमीस (त्र्यंबुलीपंचमी) जे भक्त तुझ्या दर्शनास येतील, त्यांनाच करवीरवासफल लाभेल. करवीरात कोणतेही विधि, यात्रा करणाऱ्या भाविकानी आदि- मध्य व कर्मसमाप्तीवेळी तुझे दर्शन घेतले नाही, तर त्याची उपासना व तीर्थविधी सिद्धी पावणार नाही.’ असा जगदंबेने त्र्यंबुलीला वर दिला. करवीरक्षेत्रात त्र्यंबुलीचे माहात्म्य थोर आहे.ही पूजा श्रीपूजक मयुर मुकुंद मुनिश्वर, अरुण मुनिश्वर, सोहम मुनिश्वर व सुकृत मुनिश्वर यांनी बांधली.
हेही वाचा :