नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर आलेले आफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेला भारतीय महिला पत्रकारांना बंदी घातल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसात उमटले असून विरोधी पक्षांनी भाजप केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. हा भारतीय महिला पत्रकारांचा अपमान आहे अशी सार्वत्रिक टीका होत आहे. (Muttaki)
भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्यात नवी दिल्लीत अफगाण दुतावासात चर्चा झाली. चर्चेनंतर पररराष्ट्र मंत्री मुत्तकी यांची पत्रकार झालेल्या पत्रकार परिषेवर तालिबानी राजवटीचे प्रतिबिंब पहायला मिळाले. पत्रकार परिषदेला फक्त पुरुष पत्रकारांना निमंत्रित करण्याचा निर्णय तालीबानी अधिकाऱ्यांनी घेतला. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारताच्या बाजूने महिला पत्रकारांनाही निमंत्रितांमध्ये समाविष्ट करावे अशी सूचना केली होती. पण भारताची सूचना अफगाणिस्तान तालीबानी अधिकाऱ्यांनी धुडकावून लावली. (Muttaki)
तालिबानी अधिकाऱ्यांच्या या कृत्याचे पडसाद भारतात उमटले आहेत. भारताचे माजी परराष्ट्र मंत्री पी. चिंदबरम यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ‘एक्स’ पोस्टवर असे म्हटले आहे की मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना वगळण्यात आल्याने मला धक्का बसला. महिला पत्रकारांना वगळण्यात आले आहे असे लक्षात आल्यावर पुरुष पत्रकारांनी तिथून निघून जायला हवे होते. (Muttaki)
महिला पत्रकारांना तालिबान परराष्ट्र मंत्र्याच्या काढून टाकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी खासदार प्रियांका वाड्रा यांनी केली आहे. महिलांच्या हक्काची तुमची ओळख एका निवडणूकीपासून दुसऱ्या निवडणुकीपर्यंत सोयीचे पाऊल नाही. ज्या महिला देशाच्या कणा आणि अभिमान आहेत. भारतातील सक्षम महिलांचा अपमान आपल्या देशात कसा होऊ दिला? असा प्रश्नही त्यांनी पंतप्रधानांना केला आहे. (Muttaki)
तृणमुलच्या फायरब्रॅन्ड खादार महुआ मोईत्रा यांनीही सरकारवर तीव शब्दात टीका केली आहे. तालिमानी मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारास वगळण्याची परवानगी देऊन सरकारने प्रत्येक महिलेचा अपमान केला आहे. हे लाजिरवाणे ढोंगी लोकांचे समुह आहेत अशी टीका केली आहे.
पत्रकार परिषदेत बाबत परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की आफगाणिस्तानचे मंत्री मुत्ताकी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कोणताही सहभाग नव्हता. (Muttaki)