Home » Blog » Mumbai Police notice : तोडगा… नोटीस… मुंबई सोडणार नाही…

Mumbai Police notice : तोडगा… नोटीस… मुंबई सोडणार नाही…

by प्रतिनिधी
0 comments
Mumbai Police notice

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यास सांगितले असताना दुसरीकडे मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जरांगेंना नोटीस पाठवली आहे. नोटीसीबाबत जरांगेंना विचारला असता मेलो तरी मुंबई सोडणार नाही असा सरकारला इशारा देत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbai Police notice)

मुंबई पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री  मनोज जरांगेंच्या वकिलांना नोटीस पाठवली. ज्यानंतर त्यांच्या वकिलांनी सकाळी आंदोलनस्थळी जाऊन जरांगेंना या नोटिशीबाबतची माहिती दिली. त्यानंतर जरांगेंनी पत्रकार परिषद घेत या नोटिशीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी जरांगे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही शांतता मार्गाने आंदोलन करत आहोत. कायद्याच्या चौकटीत राहून आमचे आंदोलन सुरू आहे. कोर्ट हे आंदोलकांच्या बाजूने न्याय करेल, अशी आशा आम्हाला आहे. कोर्टाचे आदेश येताच आम्ही वाहने हटवली आहेत. आता मुंबईत कुठेही वाहतूककोंडी नाही. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. काही लोक तर आंदोलन करताना नियमांचे पालन सुद्धा करत नाही, पण आम्ही न्यायालयाच्या नियमांचे पालन करत आहोत आणि यापुढेही करू, असे यावेळी जरांगेंनी म्हटले. (Mumbai Police notice)

हैद्राबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, असे स्पष्टपणे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही शांततेत उपोषणाला बसलो आहोत. आम्हाला रात्री सांगितले की, रस्त्यावरील गाड्या काढा आणि मैदानात लावा, त्यानंतर चार ते पाच तासात आमच्या पोरांनी सर्व गाड्या काढल्या, यापेक्षा अधिक पालन काय करायला पाहिजे. आम्ही कायद्याचे आणि न्याय देवतेचे पालन करतो, असेही यावेळी जरांगेंनी सांगितले. (Mumbai Police notice)

जरांगे म्हणाले,  मी सरकारला सांगतो आणि फडणवीसांना सांगतो की, सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबईत सोडत नाही.  मराठा आणि कुणबी एकच आहे या जीआरशिवाय मुंबईत सोडणार नाही.  राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा, असेही जरांगे यांनी म्हटले, या मागण्यांवर ठाम राहात जरांगे यांनी ते मुंबई सोडणार नसल्याचे म्हटले आहे. (Mumbai Police notice)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00